बिग बॉस फेम शिव ठाकरेने बजावला मतदानाचा हक्क

26 Apr 2024 17:23:59
लोकसभा निवडणूक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न
 

shiv  
 
अमरावती : लोकसभा २०२४ च्या निवडणूकीसाठी मतदान सुरु झाले असून दुसऱ्या टप्प्यामधील मतदान आज झाले. अभिनेता आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) याने मतदानाचा हक्क बजावला आहे. आज अमरावती लोकसभा मतदारसंघात शिव ठाकरेने (Shiv Thakare) कुटुंबासोबत मतदान केंद्रावर जाऊन मत दिले.
 
शिव ठाकरेने सर्वांना मतदान दिल्यानंतर आवाहन करताना म्हटले की, “मला वाटतं की मतदान हा आपला राष्ट्रधर्म आहे. आपण वर्षभर कोणत्याही गोष्टींवर जेव्हा आपापली मतं मांडतो, पण त्याआधी आपण मतदान करून आपला हक्क बजावायला पाहिजे. काही जण म्हणतात की आपल्या एका मताने काय होतंय? पण तसा विचार करायला नको, कारण आपलं एकेक मत महत्त्वाचं असतं. त्यामुळे वेळात वेळ काढून घरातून निघून मतदान करायला पाहिजे,” असे शिव म्हणाला आहे.
 

shiv  
 
शिव ठाकरे याने मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचे जेतेपद नावावर केले होते. त्यानंतर खतरों के खिलाडी, झलक दिखलाजा या हिंदी रिएलिटी शोमध्ये तो दिसला होता. याशिवाय हिंदी बिग बॉसमध्ये देखील तो स्पर्धक होता.
Powered By Sangraha 9.0