कट्टरपंथी जमावाची किशन कुमारला मारहाण; मंदिराच्या खाली असलेले दुकानही फोडले

    26-Apr-2024
Total Views |
 Gujrat
 
गांधीनगर : गुजरातमधील भरुचमधील वागरा तालुक्यातील ओचचन गावात कट्टरपंथी जमावाने किशन कुमार नावाच्या व्यावसायिकावर आणि त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. किशन हा राम मंदिराच्या खाली किराणा दुकान चालवतो. हल्ल्यादरम्यान कट्टरपंथी जमावाने गावातील सरपंच आणि किशनला वाचवण्यासाठी पुढे आलेल्यांही मारहाण करण्यात आली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि २ अल्पवयीन मुलांसह ११ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २१ एप्रिल २०२४ रोजी घडली होती. त्यादिवशी रात्री साडेदहा वाजता आरोपी अब्दुल अहमद पटेल यांची दोन मुले किशनच्या दुकानातून काही वस्तू घेण्यासाठी आले होते. यावेळी दोघांमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून शिवीगाळ झाली. दोघांची शिवीगाळ ऐकून किशनने त्यांना सामान घेऊन जा, दुकानाबाहेर महिला उभ्या होत्या, त्यांना अस्वस्थ वाटू शकते, असे सांगितले. यावरून दोन्ही भावांना राग आला. त्यानंतर दोघांनी व्यापारी व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
 
 
आवाज ऐकून जावेद, हुजेफ, मुस्ताक, रियाज, अब्दुल यांच्यासह १५-२० जणांचा जमाव आला. कशाचाही विचार न करता जमावाने किशनला घेरले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की जमावाने मंदिराच्या खाली असलेल्या किराणा दुकानावर दगडफेक केली आणि ते दुकान जाळण्याचाही प्रयत्न केला.
 
या घटनेसंदर्भात भरूच जिल्ह्यातील वाघरा पोलिसांनी अब्दुल अहमद पटेल आणि त्यांची दोन मुले रियाझ मुस्ताक पटेल, फिरोझा मुस्ताक पटेल, सबिना मुस्ताक पटेल, तस्लिमा मुस्ताक पटेल, तस्लिमा अब्दुल पटेल, सईद अहमद पटेल यांना अटक केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३३७, ४३६, ५०४ आणि ५०६ (२) अंतर्गत मुस्ताक अहमद पटेल, हुजेफ झाकीर पटेल आणि जाविद आदम पटेल यांच्यासह ११ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.