Q 4 Result: मारुती सुझुकी कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर कंपनीने ऐतिहासिक लाभांश जाहीर केला

26 Apr 2024 17:40:05

Maruti Suzuki
 
 
मुंबई: मारूती सुझुकी इंडियाला चौथ्या तिमाहीत ३८७८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या नफ्यात ४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीला ३८२३५ कोटींचा महसूल मिळाला आहे. कंपनीने प्रति समभाग १२५ रूपयांचा ऐतिहासिक लाभांश भागभांडवल धारकांना जाहीर केला आहे.
 
कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या महसूलात, निर्यातीत, विक्रीत, नफ्यात मोठी वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत २ लाख युनिट्सहून अधिक वाढ झाली आहे.आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीला ३ लाखांहून विक्री होईल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी तज्ञांच्या मते कंपनीला ३९१६ कोटींचा निव्वळ नफा होऊन ३८७७२ कोटींचा महसूल मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता.
 
कंपनींच्या ईबीआयटीडीएत (कर व खर्च पूर्व नफा) १२.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण खर्चात वाढ झालेली असली तरी निव्वळ नफ्यात व महसूलात मोठी वाढ झाली आहे. कंपनीच्या विक्रीत वाढ होताना आर्थिक स्थिती पोषक असल्याने कंपनीला याचा फायदा झाला आहे. कंपनीच्या मते याहून अधिक मागणी आगामी आर्थिक काळात मिळू शकते.
 
Powered By Sangraha 9.0