ऑलेक्ट्राला वार्षिक निकाल जाहीर; आतापर्यंत दहा हजार बसेसची मागणी

26 Apr 2024 19:28:02
Olectra Greentech Ltd annual result


मुंबई :     महाराष्ट्रात एसटी आणि बेस्ट बरोबरच पुण्याच्या पीएमपीएमलला इलेक्ट्रिक बसेस पुरवणाऱ्या ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेड चा वार्षिक आर्थिक निकाल जाहीर झाला आहे. कंपनीला आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये एकूण ८,२३२ इलेक्ट्रिक वाहनांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यात ३,००० बसेसच्या मागणीचा समावेश आहे.


हे वाचलंत का? -   २०१४ पासून जलमार्गाबाबत क्रांतिकारी निर्णय

 
दरम्यान, या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत , कंपनीने देशात १०,००० इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डर मिळवण्याचा टप्पा पार केला आहे. कंपनीने आत्तापर्यंत १,७४६ इलेक्ट्रिक वाहनांचा पुरवठा केला आहे. चौथ्या तिमाहीत १३१ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. १०,९६९ एवढ्या एकूण बसची मागणी आतापर्यंत आहे.

“आमची उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. कंपनीने दि.२४ फेब्रुवारी पासून नवीन सीतारामपूर कारखान्यात आंशिक उत्पादन सुरू केले आहे आणि या बसेसची पहिली तुकडी वितरित झाली आहे.", ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. प्रदीप यांनी सांगितले.





Powered By Sangraha 9.0