माढ्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शरद पवारांची ताकद वाढणार

    26-Apr-2024
Total Views |
NCP Sharad Pawar Madha Constituency



मुंबई : 
  ऐन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच माढ्यात शिवसेना एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तम जानकर यानंतर आता माजी आ. नारायण पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर तर मविआकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 

हे वाचलंत का? - शरद पवारांचा ‘शपथनामा’ म्हणजे शुद्ध फसवणूक!


माढा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत चर्चेत राहिला आहे. माढा मतदारसंघाची यंदाही राज्यात चर्चा असून भाजपकडून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून एकेकाळी भाजप जिल्हाध्यक्ष असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.