सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक

    26-Apr-2024
Total Views |
अभिनेता सलमान खान याच्या घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात आता पंजाबमधून आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
 

salman khan  
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) बांद्रा येथील गॅलेक्सी घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे. ज्या दोन आरोपींनी गोळीबार केला होता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून विकी गुप्ता आणि सागर या आरोपींची २९ एप्रिलपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. यानंतर (Salman Khan) आता आणखी दोन आरोपींना पंजाबमधून अटक करण्यात आली असून सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन अशी या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात होते. याशिवाय ते आघी अटक केलेल्या दोन आरोपींना बंदूक पुरवण्याचे काम करत होते.
 
मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेआधी हल्लेखोरांनी चार वेळा सलमान खानच्या घराची रेकी करुन १५ मार्चला सलमान खानच्या पनवेल मधील फार्महाऊसजवळही पोहोचले होते. मात्र बराच काळ
सलमान तिथे न गेल्यामुले बांद्रातील घरावरच गोळीबार करण्याची योजना आखली. तसेच, आरोपींकडे एक तुटलेला फोनही सापडला असून त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक फोन असल्याचा संशय पोलिसांना असून त्या शोधात आहेत.
 
 
 
दरम्यान, सलमान खानच्या घरावरील या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी ५ गोळ्या फायर केल्या आणि १७ राऊंड आम्ही जप्त केले आहेत’, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती.