Explainer : ईएसजी म्युचल फंड म्हणजे काय?

    26-Apr-2024
Total Views |

ESG Fund
 
Explainer : ईएसजी म्युचल फंड म्हणजे काय?
 
म्युचल फंडात अनेक प्रकारचे फंड असतात. प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार व आवडीनुसार गुंतवणूक करत असतो. याशिवाय प्रत्येकाचे आर्थिक ध्येय, मोजमाप वेगळी असू शकतात. गुंतवणूक ही व्यक्तीसापेक्ष असली तरी गुंतवणूकीत प्रत्येकाला परतावा हवा असतो. हा परतावा मिळत असताना प्रत्येकाचे वैयक्तिक अथवा सामाजिक ध्येय असू शकते. वैयक्तिक हितासाठी लोक म्युचल फंड एखाद्या पोर्टफोलिओ मॅनेजरकडून आपला गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ बनवतात. जसे इक्विटी फंड, डेट फंड, फ्लेक्सिकॅप फंड याच प्रकारे सामाजिक गुंतवणूकीच्या गरजेसाठी ईएसजी फंड देखील असतात.
 
नक्की ईएसजी म्युचल फंड म्हणजे काय?
 
मघाशी सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक नफ्यासाठी अथवा विशेष गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदार आपल्याला हवा तो फंड निवडतो. यापैकीच एक ईएसजी म्युचल फंड. काहींना सामाजिक विषयी अथवा पर्यावरणाविषयी विशेष रूची असते.पर्यावरणाचे व नैतिकतेचे गणित जपण्यासाठी काहीना ग्रीन इन्व्हेसमेंट करायला आवडते. त्याच प्रमाणे हे ईएसजी म्युचल फंड असतो.
 
ईएसजी म्हणजे (Environmental, Social, Governance) म्युचल फंड -
 
जागतिक पातळीवरील टिकाऊ विकासासाठी कंपन्यांना ईएसजी बंधने पाळावी लागतात. ज्यामध्ये कंपन्या नफा कमावणे या लक्षाखेरीज सामाजिक बांधिलकी, पर्यावरण, आदर्श कारभार यासाठी प्रयत्न करतील असे समाजात अपेक्षित असते. याच बंधनकारक नियमनासाठी काही कंपन्या पर्यावरणाला महत्व देऊन त्यांचे महत्व अबाधित ठेवण्याकरिता पर्यावरण पूरक कारभार करतात अथवा उत्पादन करतात.त्यामुळे काही व्यक्तींना अशा फंडात गुंतवणूक करायची इच्छा असते ज्यामध्ये पर्यावरणविषयक महत्व अधोरेखित होईल.अशा फंडात गुंतवणूक व्यक्ती करून पर्यावरणाचे महत्व टिकवू शकतात. या फंडांचा ईएसजी फंड असे म्हणतात.
 
मुख्यत्वे मूलभूत सुविधा, पर्यावरण सेवा, तंत्रज्ञान, आरोग्य या प्रकारच्या कंपन्यांमध्ये हे फंड उपलब्ध असतात. त्यानुसार गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करता येते.