एडलवाईस म्युचल फंडाने निफ्टी अल्फा लो वोलेटालिटी ३० इंडेक्स काढला

२६ फेब्रुवारी ते १० मे २०२४ पर्यंत हा एनएफओ सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असणार

    26-Apr-2024
Total Views |

Edelweiss Mutual Fund
 
 
मुंबई: एडलविस असेट मॅनेजमेंट लिमिटेड (EAMC) या भारतातील महत्वाच्या असेट मॅनेजमेंट कंपनीने निफ्टी अल्फा वोलेटालिटी ३० इंडेक्सचे अनावरण केले आहे. २६ एप्रिल २०२३ पासून हा एनएफओ (NFO) सुरू होणार आहे. फंड बंद होण्याची तारीख १० मे २०२४ सांगण्यात आली आहे.आघाडीच्या १५० समभागांपैकी ३० विशेष समभाग यात निवडण्यात आले असुन ज्या समभागांनी गेल्या काही दिवसांत दैदिप्यमान कामगिरी केली आहे व इतरांपेक्षा कमी प्रमाणात चढ उतार (Volatile) झाले आहेत असे ३० समभाग यामध्ये निवडण्यात आले आहेत.
 
एप्रिल २००५ पासून निफ्टी अल्फा लो वोलेटालिटीने ३० इंडेक्स, निफ्टी १०० TRI इंडेक्स हून अधिक चांगली कामगिरी केली आहे.५ वर्षांच्या रोलिंग रिटर्नच्या आधारावर 88% आणि 10-वर्षांच्या रोलिंग रिटर्नच्या आधारावर १००% वेळा मागे टाकले आहे. या कालावधीत,त्याने अनुक्रमे ५.२ % आणि ५.९ % सरासरी जादा परतावा दिला आहे.
 
लाँच बद्दल बोलताना, मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालिका, एडलवाईस म्युच्युअल फंड राधिका गुप्ता म्हणाल्या, “हा फंड लार्ज कॅप ओरिएंटेड स्ट्रॅटेजीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श उपाय आहे जो व्यापक बाजाराला मागे टाकू शकतो.अल्फा आणि कमी-अस्थिरता घटकांचे मिश्रण करून हा बहु-घटक दृष्टीकोन,अस्थिरता कमी करताना कामगिरी वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवते, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी जोखीम-समायोजित परतावा वाढतो. पॅसिव्ह डेट फंडाचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ व्यवस्थापित करत, एडलवाईस एएमसीने निष्क्रिय फंड श्रेणीमध्ये एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली आहे. या नवीन इक्विटी इंडेक्स फंडाचा परिचय इक्विटी पॅसिव्ह फंड सेगमेंटमधील आमची उत्पादन श्रेणी आणखी मजबूत करते.”
 
या योजनेत उत्पन्न वितरणासह उत्पन्न वाढ, भांडवल काढणे (IDCW) अशा दोन्ही योजनांचे पर्याय उपलब्ध करून देते. ही योजना इक्विटी व त्यांच्याशी संबंधित ९५-१०० टक्के गुंतवणूकीची संधी देत निफ्टी अल्फा लो वोलेटालिटी ३० इंडेक्सचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये ० ते ५ टक्के गुंतवणूक डेट व मनी इन्स्ट्रुमेंट यांना वितरित केलेली आहे. दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि त्रैमासिक SIP साठी किमान गुंतवणूक रक्कम १०० रुपये आणि त्यानंतर 1 रुपयांच्या पटीत असेल. ही योजना हायब्रीड व सोलूशन फंडचे सह अध्यक्ष भावेश जैन पाहणार आहेत.
 
अनुक्रमे जून आणि डिसेंबरमध्ये ही योजना घटक-भारित आणि पुनर्संतुलित अर्धवार्षिक असेल.स्टॉक वेट हे गेल्या वर्षभरातील उच्च जेन्सेन अल्फा आणि कमी अस्थिरतेद्वारे निर्धारित केले जातात. नॉन एफ अँड ओ स्टॉक आणि एक वर्षापेक्षा कमी लिस्टिंग इतिहास असलेले समभाग गुंतवणुकीच्या विचारातून वगळण्यात आले आहेत.