मुंबई ते गोरखपूरला उन्हाळी विशेष एसी रेल्वे

८ पूर्ण वातानुकूलित विशेष गाड्या सोडण्यात येणार

    26-Apr-2024
Total Views |

Train


मुंबई, दि.२६ :  
मुंबई ते उत्तरेकडे अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते दानापुर-गोरखपुर दरम्यान ८ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

०११०७ वातानुकूलित विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ३० एप्रिल आणि दि. दि. ४ मे रोजी रात्री ११.२० वाजता सुटेल आणि दानापुर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता पोहोचेल. या गाड्यांच्या २ फेऱ्या चालवल्या जातील. ०११०८ वातानुकूलित विशेष दानापुर येथून दि. ०२ मे आणि दि. ०६ मे रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ५ वाजता १७.०० वाजता पोहोचेल. २ फेऱ्या चालविल्या जातील. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा याठिकाणी या ट्रेन थांबतील.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपुर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष


०११०९ वातानुकूलित विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. २८.एप्रिल आणि दि.०२ मे रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि गोरखपुर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या २ फेऱ्या चालविल्या जातील. ०१११० वातानुकूलित विशेष गोरखपुर येथून दि. ३० एप्रिल आणि दि. ०४ मे रोजी ११.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुसऱ्या दिवशी ११.१५ वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या प्रत्येकी २ फेऱ्या चालविल्या जातील. या ट्रेनला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती याठिकाणी या ट्रेनला थांबे असतील. या दोन्ही वातानुकूलित विशेष ट्रेनसाठी दि. २७ एप्रिल रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.