'भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहणार '

26 Apr 2024 12:03:12

Indian Economy
 
 
 
 
मुंबई: भारतीय अर्थ मंत्रालयाने भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. जागतिक पातळीवरील मंदी अथवा महागाईचे आव्हान असले तरी भारताअंतर्गत वाढती उत्पादन मागणी, विकास दर वाढ व स्थिर किंमती यामुळे अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत राहिले असे अनुमान अर्थमंत्रालयाने आपल्या अहवालात केले आहे. यावेळी मान्सून देखील समाधानकारक स्थितीत असल्याने शेतकी उत्पादनात देखील वाढ होईल असे भाकीत मंत्रालयाने केले आहे.
 
कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीमुळे त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होऊ शकतो.भारतातील ट्रेड डेफिसिट (व्यापारीतील वित्तीय तूटीत) देखील घट होणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सरकारने प्रोडक्शन लिंक इनसेंटिव (PLI) सारख्या योजनांमुळे भारतातील उत्पादन निर्मितीत मोठी वाढ होत आहे.पाश्चिमात्य देशांमधील महागाई व दबाव पाहता हे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हान असले तरी भारत या गोष्टींवर मात करेल असा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
 
विकसित देशांत आगामी मंदीचा विचार केला तरी भारतातील विकासाचा दर तेजीत राहू शकतो असे मंत्रालयाने म्हटले आहे. भारतातील वाढत्या गुंतवणूकीमुळे,उत्पादनातील वाढत्या मागणीमुळे, विकासातील वेगामुळे भारताच्या आर्थिक कामगिरीत वाढ होणार असल्याचे निरिक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती देताना,'जागतिक आव्हाने असूनही, भारत त्याच्या मजबूत आर्थिक कामगिरीसह उभा आहे, सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक-आधारित वाढ अधोरेखित करत आहे आणि जागतिक वाढीच्या मार्गाला पाठिंबा देण्यासाठी आपली निर्णायक भूमिका ठामपणे मांडत आहे.' असे म्हटले आहे.
 
अहवालात म्हटल्याप्रमाणे, जून ते सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता असून तया काळात चांगली पेरणी होऊ शकते. उत्पादनात वाढ झाल्याने किरकोळ महागाईचा प्रश्न सुटू शकतो.अन्न महागाई काही प्रमाणात राहणार असली तरी उत्पादनात वाढ झाल्याने अन्न पुरवठ्यात वाढ होऊ शकते ' असे नमूद केले आहे.किंमतीवरील दबाव कायम राहत किरकोळ महागाई ५.४ टक्क्यांवर राहू शकते असे अहवालात म्हटले आहे.
 
प्रोडक्शन लिंक इनसेंटिव मुळे भारतीय उत्पादनात वाढ झाल्याने ट्रेड डेफिसिटमध्ये घट होऊ शकते. आगामी काळात ट्रेड डेफिसिटमध्ये १ टक्क्यांनी घट होईल असा अंदाज या अहवालात वर्तवला गेला आहे.
Powered By Sangraha 9.0