गझलकार सुरेश भटांच्या जयंतीनिमित्त वसईत विवा कट्ट्याचे आयोजन

25 Apr 2024 14:27:44
 
suresh bhat
 
मुंबई : यंग स्टार ट्रस्ट आयोजित 66 वा विवाकट्टा येत्या रविवारी दि. 28 एप्रिल रोजी आयोजित केला आहे. वसईतील साहित्य आणि कलारसिकांसाठी हा विवाकट्टा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संध्याकाळी वसईतील पापडी येथे आयोजित केला जातो. या महिन्यातील विवा कट्ट्याचा विषय आहे गझलकार सुरेश भटांच्या कविता आणि गझल. इच्छुक सादरकर्त्यांनी सुरेश भटांच्या गझल किंवा कविता किंवा आठवणींचे किस्से यावेळी सादर करावेत असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रविवारी दिनांक 28 एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता हुतात्मा बाळासाहेब पापडी येथे या कट्ट्याचे आयोजन केले आहे तरीही इच्छुक सादरकर्त्यांनी आपली नावे आयोजकांकडे 27 एप्रिल पर्यंत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी स्वाती जोशी मकरंद असावे आणि प्रकाश वनमाळी त्यांच्याशी अनुक्रमे 94 230 27 631, 98 22 31 440 1 व 98 222 631 77 संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0