पालघर येथे अंतरंगी डोकावताना पुस्तकाचे प्रकाशन

    25-Apr-2024
Total Views |

book publication 
 
मुंबई : अंतरंगी डोकावताना हे प्राचार्य डॉ. किरण सावे लिखित पुस्तक दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्रकाशित होत आहे. डिंपल पब्लिकेशन आणि सोनोपंत दांडेकर कला वा. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा दांडेकर महाविद्यालयाच्या देवीदिन तेवारी सभागृहात होत आहे. यावेळी दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सीए सचिन कोरे आणि ज्येष्ठ अभिनेत्री चिन्मय सुमित प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
 
डॉक्टर किरण सावे यांचे यापूर्वी योगतत्त्वज्ञान तसेच टचार्वक दर्शन प्रासंगिकता असे दोन ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यानंतर अंतरंगी डोकावताना हा तिसरा ग्रंथ डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. सावे हे तत्त्वज्ञान मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या विषयांचे अभ्यासक असून त्यांचे अध्यापनाचेही हेच विजय आहेत. हे पुस्तक मनाचे तत्व व मानवी मनाचा गाभा अशा विषयांना अनुसरून लिहिले गेले आहे. प्रकाशक अशोक मुळे यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य रसिकांना केले आहे.