सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या सूचना, पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

    25-Apr-2024
Total Views |

salman khan 
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या गॅलेक्सी घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दोन आरोपींनी त्याच्या घरावर ५ गोळ्या झाडल्या होत्या. या दोघांना ४० गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, या (Salman Khan) प्रकरणात गँगस्टर लॉरेन बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यालाही आरोपी करण्यात आले आहे.
 
दरम्यान, सलमान खानच्या घरावरील या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी ५ गोळ्या फायर केल्या आणि १७ राऊंड आम्ही जप्त केले आहेत’, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
 
तसेच, अधिक माहितीनुसार सलमान खानच्या घरावर गोळीबार करून आरोपींनी पळ काढला होता आणि पोलिसांनी पकडू नये म्हणून त्यांनी अनेकदा कपडेही बदलले होते. याव्यतिरिक्त दोन्ही आरोपी इंटरनेटच्या माध्यमातून तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात देखील होते. एका आरोपीने मोबाइल वायफायसोबत जोडून ठेवला होता. या प्रकरणात आरोपींनाराज्याच्या बाहेरून राजस्थान, बिहार आणि हरियाणातून आरोपींना मदत पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून मदत पुरवणाऱ्यांच्या शोधात पोलिस आहेत.
 
सलमान गोळीबार प्रकरणात गुजरातमधून पोलिसांनी पकडलेल्या आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने २९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.