रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नर पदी पुन्हा एकदा टी रवी शंकर यांची नियुक्ती

25 Apr 2024 12:52:28

Ravi shankar rbi
 
 
मुंबई: केंद्र सरकारने टी रवीशंकर यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उप गव्हर्नर म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात एक वर्षाची भर पडलेली आहे.ही नेमणूक ३ मे २०२४ पासून लागू होणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम फील पदवी प्राप्त केली होती.
 
यापूर्वी त्यांनी आरबीआयमध्ये त्यांनी कार्यकारी संचालक पदावर काम केलेले आहे.त्यांनी आरबीआयमध्ये १९९० साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.फायनाशियल मार्केट,पेमेंट सेटलमेंट,पब्लिक डेट मॅनेजमेंट या विविध विभागांतील स्तरावर त्यांनी काम केलेले आहे. २०२० साली त्यांची इंडियन फायनांशियल टेक्नॉलॉजी व अलाईड सर्विसेस (IFTAS) मध्ये चेअरमनपदी निवड झाली होती. यापूर्वी त्यांनी इंटरनॅशनल मॉनेटरी फंडमध्ये देखील काम केले आहे
 
Powered By Sangraha 9.0