जेपी मॉर्गनचे जेमी डेमन यांचे मोदींविषयी कौतुकाचे उद्गार म्हणाले मोदींनी…

25 Apr 2024 18:31:51

jp demon
 
 
मुंबई: अमेरिकन बँकिंग कंपनी जेपी मॉर्गनचे अध्यक्ष जेमी डेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यांनी कौतुक करताना म्हटले,'पीएम मोदींनी भारतातील ४० कोटी नागरिकांना गरीबीतून बाहेर काढले आहे.'मोदी यांनी देशासाठी जबरदस्त काम केले आहे. मला माहिती आहे लिबरल मिडियाने त्यांच्यावर नेहमी टिकास्त्र सोडले आहे ' असे उद्गार त्यांनी न्यूयॉर्क येथील एका कार्यक्रमात काढले आहे.
 
डेमन यांनी बोलताना मोदींचे भारतातील अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या सु़धारणाबाबत कौतुक केले. भारतातील मूलभूत सुविधा, आर्थिक व सरकारी पातळीवरील केलेले व्यवस्थेची केलेले आमूलाग्र बदल व केलेला विकास या मुद्यावर जोर देत त्यांनी लिबरल मिडियावर टिकास्त्र सोडले आहे. भारतातील अनेक वंचित लोकांना शौचालय उपलब्ध केले असतानाही वातावरणातील बदल, कामगारांचे प्रश्न इतर मुद्यावर मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असला तरी वस्तुस्थिती मोदींचे काम वाखाणण्याजोगे असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
 
व्यवस्थेतील केलेल्या बदलाबाबत बोलताना डेमन म्हणाले,' मोदी सरकारांच्या काळात ७०० दशलक्ष लोकांची बँक खाती उघडण्यात आली.त्यांचे पेमेंट ट्रान्स्फर होत आहे.मूलभूत सुविधेत बदलापासून शैक्षणिक व्यवस्थेत बदल होत आहे हे केवळ एक कणखर माणसामुळे' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याखेरीज मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकतात असेही डेमन म्हणाले आहेत. ते जिंकल्यास भारतीय बाजारात त्याचा मोठा फायदा होऊन २५००० पेक्षा अधिक बाजार जाऊ शकते असा अंदाजही त्यांनी बोलताना व्यक्त केला.
 
जिथे मूलभूत सुविधा नव्हत्या तिथे शौचालयापासून इतर सुविधांवर काम करून देखील आम्ही त्यांना देश कसा चालवावा यावर शिकवण देत आहोत असे टिकास्त्र त्यांनी लिबरल मिडियावर सोडले आहे. त्यांनी पुढे सांगितले, 'भारतात २९ राज्य आहेत प्रत्येक राज्यात विविधता आहे.वेगवेगळी कर प्रणाली आहे. मात्र मोदींनी संपूर्ण देशात एक कर कायदा लागू केला त्यामुळे देशाला त्याचा फायदा झाला असून भष्टाचारावर नियंत्रण ठेवणे सरकारला शक्य झाले आहे. 'असे डेमोन म्हणाले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0