सिडको व्यवस्थापक विजय सिंघल यांची प्रकल्पस्थळांना भेट

नवी मुंबईतील विकास प्रकल्पांच्या कामाचा घेतला आढावा

    25-Apr-2024
Total Views |

cidco


मुंबई, दि.२५ : 
सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवार, दि. २४ एप्रिल रोजी पुष्पक नोडमधील सेक्टर-२७, २८, २९ व ३०, उलवे किनारी मार्ग प्रकल्प, विमानतळ जोडणी करणारे पूल क्र. ४, ५ व ९ तसेच सायन्स पार्क आणि खारघर हिल प्लेट्यू या प्रकल्प स्थळांना भेट देऊन आढावा घेतला. दरम्यान, उपाध्यक्ष आणि तथा व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच सिंघल यांनी सातत्याने नवी मुंबईत सुरु असणाऱ्या प्रकल्पांचा प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आढावा घेतला आहे.


याचाच भाग म्हणून त्यांनी बुधवार,दि.२५ रोजी प्रकल्पांची पाहणी करून कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल,सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, मुख्य नियोजनकार (नवी मुंबई व नैना) रविंद्र मानकर, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व विशेष प्रकल्प) शीला करुणाकरन आणि इतर प्रकल्पांशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.