“लता दीदींमुळे पहिल्यांदा ८०च्या दशकात परदेशात परफॉर्मन्स केला”, बिग बींनी दिला आठवणींना उजाळा

25 Apr 2024 13:51:19
अमिताभ बच्चन यांचे वडिल सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी लता दीदींचा उल्लेख मधाची धार असा केला होता.
 

amitabh bachchcan 
 
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार नुकताच पद्मविभूषण अमिताभ (Amitabh Bachchan) यांचा प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी लता दीदींची एक विशेष आठवण सांगितली. गेल्या काही वर्षांपासून कलाकार परदेशात जाऊन नृत्य अथवा गायनाचे लाईव्ह कार्यक्रम करतात. पण तुम्हाला माहित आहे का? महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील एकेकाळी असे कार्यक्रम सादर करत होते. त्यांनीच स्वत:च या कार्यक्रमावेळी तो किस्सा सांगितला.
 
अमिताभ बच्चन म्हणाले, “गेल्या काही वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार परदेशात जाऊन नृत्य, गायनाचे कार्यक्रम सादर करताना दिसत आहे. बऱ्याचजणांना कदाचित माहित नसेल पण मी देखील ८० च्या दशकात परदेशात जाऊन मी देखील असे कार्यक्रम करत होतो. पण माझ्या या कार्यक्रमांचा श्रीगणेशा लता दीदींच्या हातूनच झाला होता. १९८१ ची ही घटना आहे. मी न्युयॉर्कमध्ये होतो. माझ्या एका मित्राने मला सांगितलं की लता दीदी देखील न्युयॉर्कमध्येच आहेत आणि त्यांना मला भेटायचं आहे. मी त्यांना भेटायला गेलो . लता दीदी मला म्हणाल्या की, आता थोड्या वेळात माझा मंचावर कार्यक्रम आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की, दोन मिनिटांसाठी मंचावर येऊन तुम्ही प्रस्तुती करा.आता त्यांनी म्हटल्यामुळे मी होकार दिला. पुढे त्या मला म्हणाल्या की मी अलीकडेच ऐकलं आहे की तु्म्ही एका चित्रपटात गाणं गायलं आहे.त्यावर मी म्हणालो की ते असचं गाऊन गेलो मी. तो चित्रपट होता लावारिस आणि गाणं होतं मेरे अंगने मै. आता मी विचारात पडलो. पण लता दीदींच्या आग्रहाखातर मी त्या मंचावर ते गाणं गायलं. आणि आश्चर्याची बाब म्हणजे प्रेक्षकांना माझा परफॉर्म्सन्स आवडला आणि त्यानंतर दरवर्षी माझा देखील परदेशात कार्यक्रम सुरु झाला”.
 
यावेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देखील मान्यवरांना प्रदान करण्यात आले. अशोक सराफ, अतुल परचुरे, ए.आर.रेहमान, रुपकुमार राठोड, पद्मिनी कोल्हापुरे यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0