मराठी भाषा शिकण्यासाठी मी प्रयत्नशील – अमिताभ बच्चन

    25-Apr-2024
Total Views |
महानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट लवकरच येणार असून सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे.
 

amitabh bachchcan 
 
मुंबई : पद्मविभूषण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते या पुरस्काराचे तिसरे मानकरी असून पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरा पद्मविभूषण आशा भोसले यांना देण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना (Amitabh Bachchan) मराठी भाषेचा एक विशेष किस्सा सांगितला.
 
“एका कार्यक्रमात मी भाषणाला हिंदी भाषेत सुरुवात केली आणि प्रेक्षकांमधुन आवाज आला ए मराठी मराठी. ते ऐकून मी उपस्थितांची माफी मागितली. आणि मी त्यांना म्हणालो की मी मराठी शिकत आहे. या घटनेला १०-१२ वर्ष उलटून गेली पण अजूनही मी मराठी शिकू शकलो नाही. आधी वेळ नव्हता पण आता वयामुळे वेळ मिळत असून त्याचा सदुपयोग करण्यासाठी मी मराठी भाषा शिकत आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी कबूली अमिताभ बच्चन यांनी दिली.
 

amitabh bachchcan 
 
यावेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देखील मान्यवरांना प्रदान करण्यात आले. अशोक सराफ, अतुल परचुरे, ए.आर.रेहमान, रुपकुमार राठोड, पद्मिनी कोल्हापुरे यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.