तेलंगणात निर्माणाधीन पूल कोसळला

८ वर्षांपासून सुरु होते पुलाचे काम

    24-Apr-2024
Total Views |

telangana


तेलंगणा दि.२४ : वृत्तसेवा 
तेलंगणातील पेद्दापल्ली जिल्ह्यातील मनैर नदीवरील एका बांधकामाधीन पुलाचा एक भाग प्रतिकूल हवामानामुळे सोमवार आणि मंगळवारी मध्यरात्री कोसळला. परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यादरम्यान झालेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पेड्डापल्ली आणि भूपालपल्ली जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा पूल बांधला जात होता.

विशेष म्हणजे, दोन जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि वाहतूक सुरळीत करणे या उद्देशाने ४९ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये २०१६ मध्ये या एक किलोमीटर लांबीच्या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.मात्र, प्रकल्प सुरू होऊन सुमारे आठ वर्षे उलटली तरी तो अपूर्णच आहे. या प्रकल्पाच्या कथित गैरव्यवहारामुळे पुलाच्या बांधकामाला विलंब झाला. पूर्ण झालेल्या कामांची देयके देण्यास उशीर झाल्यामुळे कंत्राटदाराने काही वर्षांतच बांधकाम थांबवले. या पुलाच्या उभारणीतून मंथनी, परकाल आणि जम्मिकुंता या तीन शहरांतील अंतर सुमारे ५० किमीने कमी करायचे होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कमिशनच्या दबावामुळे कंत्राटदाराने एक-दोन वर्षांत काम थांबले होते.