शेअर बाजार अपडेट: बाजार उसळला ! सेन्सेक्स ३५३.३७ अंशाने वाढत ७४०९१.८२ निफ्टी १००.१० अंशाने वाढत २२४६८.१० पातळीवर

गुंतवणूकदारांना रिअल्टी, मेटल समभागात सर्वाधिक वाढ , एफएमसीजी व आयटी भागात सर्वाधिक नुकसान

    24-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळी मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांकात ३५३.३७ अंशाने वाढत ( ०.४८ %) ७४०९१.८२ पातळीवर पोहोचला असून निफ्टी ५० हा १००.१० अंशाने (०.४५%) वाढत २२४६८.१० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक २६७.९३ अंशाने वाढत ५४५८७.०६ पातळीवर पोहोचला तर निफ्टी बँक निर्देशांक २५१.०० अंशाने (०.५२%) वाढ होत ४८२२१.४५ पातळीवर पोहोचला आहे.
 
आज आशियाई बाजारात स्थिरता आली असताना भारतीय अर्थव्यवस्थेत एस अँड पी ग्लोबल इंडेक्स व मॉर्गन स्टेनले अहवाल व आरबीआयच्या अर्थव्यवस्थेतील दरवाढीमधील भाकितामुळे आज गुंतवणूकदारांना व मध्यपूर्वेतील वातावरण स्थिर झाल्याने आजचे बाजार उत्साहवर्धक राहिले आहेत.
 
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६७ टक्क्याने व ०.९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६० व ०.४३ टक्क्यांनी घट झाली आहे. आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील एफएमसीजी व आयटी समभागात घसरण झाली आहे तर सर्वाधिक वाढ रिअल्टी (१.४%) ,हेल्थकेअर (१.५%) मेटल (१.७२) समभागात झाला आहे.या शिवाय कनज्यूमर ड्युरेबल्स, फार्मा, प्रायव्हेट बँक या समभागातही वाढ झाली आहे.
 
बीएसईत जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील,बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा, पॉवर ग्रीड, बजाज फायनान्स, एनटीपीसी,अल्ट्राटेक सिमेंट,लार्सन,एक्सिस बँक,एचडीएफसी बँक, सनफार्मा,नेस्ले, एम अँड एम, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स या समभागात आज वाढ झाली आहे.इन्फोसिस, एचयुएल, टेक महिंद्रा, एशियन पेंटस, एचसीएलटेक या समभागात आज नुकसान झाले आहे.
 
एनएसईत आज सिप्ला, हिंदाल्को, जेएसडब्लू, टाटा स्टील, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रीड, बजाज फायनान्स, डिवीज,आयशर मोटर्स, एनटीपीसी, अपोलो हॉस्पिटल, अल्ट्राटेक सिमेंट, एक्सिस बँक, नेस्ले, सनफार्मा, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो या समभागात वाढ झाली आहे. टाटा कनज्यूमर, इन्फोसिस, एचयुएल, एशियन पेंटस, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, भारती एअरटेल या समभागात आज घट झाली आहे.