Q4 Results: टाटा कनज्यूमर प्रोडक्टचा तिमाही निकाल जाहीर,कंपनीच्या निव्वळ नफ्यात १९ टक्क्यांनी घट, महसूलात ९ टक्क्यांनी वाढ

24 Apr 2024 12:03:56

Tata Consumer Products
 
 
मुंबई: टाटा कनज्यूमर प्रोडक्टने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. टाटा कनज्यूमर ड्युरेबल्स कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष २२०३-२४ मध्ये १९ टक्क्यांनी घसरला आहे. मागील वर्षाच्या २६९ कोटी रुपयांच्या तुलनेत या आर्थिक वर्षात कंपनीला २१७ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.कामकाजातून कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर (YoY) बेसिसवर कंपनीला ८ टक्क्यांनी भर पडत ३९२७ कोटीवर महसूल पोहोचले आहे.
 
कंपनीच्या ईबीआयटीडीए (EBITDA) (कर व इतर खर्च पूर्व नफा) २३ टक्क्यांनी वाढत ६२९.६ कोटींवर पोहोचला आहे.मागील वर्षी ईबीआयटीडीए ५११.६७ कोटी रुपये होता. कंपनीच्या एकूण मार्जिनमध्ये मागील आर्थिक वर्षातील १४.१३ टक्क्यांवरून वाढत १६.०३ टक्क्यांवर वाढले आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षाच्या २६७.७१ कोटींच्या तुलनेत घट होत निव्वळ नफा २६७.७१ कोटींवर पोहोचला आहे.
 
कंपनीच्या एकूण महसूलात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या शीतपेये विभागात चौथ्या तिमाहीत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चहा विभागात कंपनीला २ टक्क्यांनी महसूलात वाढ झाली आहे. कॉफी विभागातील महसूलात ४५ टक्क्यांनी इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली आहे. कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति समभाग (Share) ७.७५ रुपये लाभांश (Dividend ) देण्यासाठी सुचवले आहे. याबाबत भागभांडवलधारकांच्या बैठकीत अंतिम निर्णय दिला जाईल.
 
Powered By Sangraha 9.0