कोटक बँकेवर नवे निर्बंध - यंत्रणा दुरुस्तीपर्यंत नवे ग्राहक स्विकारण्यास अथवा नवे क्रेडिट कार्ड देण्यास मनाई

बँकेचे लेखापरीक्षण होणार !

    24-Apr-2024
Total Views |

Kotak
 
मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेने कोटक महिंद्रा बँकेला नवीन क्रेडिट कार्ड वाटपास व नवी खाती घेण्यास मनाई केली आहे. ऑनलाईन अथवा मोबाईल बँकिंग प्रणाली मार्फत नवीन ग्राहक जोडण्यास व क्रेडिट कार्ड वाटपास मनाई केली आहे.
 
आरबीआयने कोटक बँकेच्या कारभारात पारदर्शकता न आढळल्याने ही कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन व कंपलायंस न केल्याने ही कारवाई करण्याचे आरबीआयने ठरवल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.याकारवाई व्यतिरिक्त अस्तिवात असलेल्या ग्राहकांना मात्र बँक सेवा पुरवू शकणार आहे. बँकिंग नियंत्रण कायदा ३५ अ अंतर्गत ही कारवाई आरबीआयने बँकेवर केली आहे.
 
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कोटक बँकेच्या माहिती तंत्रज्ञान (IT) विभागातील काही त्रुटी अढळल्याने आरबीआयने या विभागात 'मोठी समस्या' असल्याचे सांगत ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या तंत्रज्ञान विभागातील आलेल्या अडथळ्यांमुळे ही कारवाई झाली. संगणक साहित्य प्रणाली, सॉफ्टवेअर अद्यावत न करणे,आयटी सिक्युरिटी अशा विविध पातळ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे
 
यापूर्वी आरबीआयने नोटीस बजावूनदेखील या तंत्रज्ञान विभागात आवश्यक ते बदल करण्यात आले नाही किंबहुना चूक सुधारण्यात चालढकल करत दुर्लक्ष केले गेल्याचे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ग्राहकांच्या हितासाठी ही कारवाई होत भविष्यात दर्जेदार डिजिटल सुविधा मिळण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. यापुढे सेंट्रल बँकेच्या बाह्य लेखा परिक्षण (External Audit) मध्ये आलेले निष्कर्ष पाहत पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे. लेखापरीक्षण अहवालात आढळलेल्या चुका दुरुस्त करणे बँकेला बंधनकारक असणार आहे.
 
कारवाईबाबत अधिक माहिती देताना आरबीआयने म्हटले आहे की,'मजबूत IT इन्फ्रास्ट्रक्चर आणि IT जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्कच्या अनुपस्थितीत, बँकेची कोअर बँकिंग प्रणाली (CBS) आणि तिच्या ऑनलाइन आणि डिजिटल बँकिंग चॅनेलला गेल्या दोन वर्षांत वारंवार आणि लक्षणीय अडचणींचा सामना करावा लागला आहे,अलीकडील १५ एप्रिलला याच प्रकारचा सेवा व्यत्यय आला होता.परिणामी ग्राहकांची गंभीर गैरसोय झाली," RBI ने सांगितले.
 
आरबीआयच्या मते आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट,चेंज मॅनेजमेंट,युजर एक्सेस मॅनेजमेंट,वेंडर रिस्क मॅनेजमेंट,डेटा सिक्युरिटी या विभागात प्रामुख्याने आरबीआयच्या निरीक्षणात त्रुटी आढळून आल्या आहेत.यापूर्वी आरबीआयने अशा प्रकारचे निर्बंध एचडीएफसी बँकेला लागू केले होते. बँकेच्या डिजिटल प्रणालीत सुधारचा झाल्यावर ते निर्बंध मागे घेण्यात आले होते. आज कोटक बँकेच्या समभागात साधारणपणे १.६४ टक्क्यांनी वाढ झाली होती.