मॉर्गन स्टॅनलीने भारताचा जीडीपी वेगवान वाढण्याची शक्यता वर्तवली

देशांतर्गत उत्पादनतील मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता

    24-Apr-2024
Total Views |

morgan stanley
 
मुंबई: मॉर्गन स्टॅनली या आघाडीच्या जागतिक गुंतवणूक कंपनीने भारताच्या अर्थव्यवस्थेला आपल्या अहवालात दाद दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, देशांतर्गत मागणीत मोठी वाढ झाल्याने आज भारतीय अर्थव्यवस्था विकासात वाढ होत आहे. कंपनी अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक असून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारत ६.८ टक्क्यांनी व आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीडीपी ६.५ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे.
 
महागाईबाबत दावा करताना कंपनीने म्हटले, ' महागाई दर दुसऱ्या तिमाहीत ५ टक्क्यांपर्यंत राहू शकतो.२०२४ मधील दुसऱ्या मध्यात हा कमी होत ४.१ टक्क्यांवर राहू शकतो असा अंदाज कंपनीने आपल्या निरिक्षणात मांडला आहे. कंपनीच्या मताप्रमाणे, पुढील आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर ४.५ टक्क्यांपर्यंत राहू शकतो.आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये चालू खात्यातील तूट (Current Account Deficit) १ ते १.५ टक्क्यांनी घटू शकते असे कंपनीने म्हटले आहे.भारताच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्याने ही वित्तीय तूट भरु शकते असा अंदाज कंपनीने वर्तवला आहे.
 
अमेरिकन अर्थव्यवस्थतेतील आगामी तेजी व बळकट उत्पादकतेमुळे भविष्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होणे शक्य असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपला रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेऊ शकतो असे भाकीत कंपनीने केले आहे.
 
याखेरीज महागाईवर कंपनीने चिंता व्यक्त करत यावर पतधोरण समितीने धोरण आखण्याची गरज असल्याचे मॉर्गन स्टॅनलीने म्हटले आहे. आरबीआयच्या मुख्य धोरणातही महागाई ४ टक्क्यांपर्यंत नियंत्रित ठेवण्याचे असल्याने आगामी काळात आरबीआयच्या बैठकीत उपाययोजना शोधण्याची शक्यता आहे. विशेषतः अन्नधान्य भाजीपाला यांच्या महागाई दरात नियंत्रण आणण्यासाठी आरबीआय प्रयत्न करू शकते.आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७.२ टक्क्यांनी वाढली होती.
 
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताच्या ८.७ टक्क्यांनी वाढ झाली होती. मध्यंतरी इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने भारताची अर्थव्यवस्था जगातील वेगवान अर्थव्यवस्था ठरणार असल्याचे सुतोवाच केले होते.