Just In- टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार?

    24-Apr-2024
Total Views |

Tata Capital
 
 
मुंबई: टाटा कॅपिटल ही टाटा समुहातील वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी आहे.' ET Now 'ने दिलेल्या बातमीप्रमाणे टाटा कॅपिटल लवकरच कंपनीचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे.
 
टाटा समुहाकडे स्वतः चे ९५ टक्के इक्विटी भागभांडवल या वित्तीय सेवा कंपनीत आहे. कंपनी यासाठी बँकर्सकडे पाचारण करणार असून आर्थिक वर्ष २०२४ अखेरपर्यंत हा आयपीओ येण्याची शक्यता असल्याचे प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे.
 
टाटा सन्स व टाटा कॅपिटल या दोन मोठ्या विना बँकिंग आर्थिक संस्था (NBFC) आहेत. आरबीआयच्या नियमानुसार टाटा सन्सला कंपनी नोंदणीकृत (लिस्टिंग) करावे लागणार आहेत. टाटा सन्सला २०५० पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. मार्च ३१ पर्यंत टाटा कॅपिटलवर २०००० कोटींचा आर्थिक बोजा आहे. आयपीओ टाळण्यासाठी काढण्यासाठी टाटा सन्सने आरबीआयकडे विनंती केली होती.