मुंबई भायखळा उद्यानात वैचारिक मेजवाणी

बुध्द-भीम गितांचा जलसा आणि व्याख्यानांचे आयोजन

    24-Apr-2024
Total Views |
BMC


मुंबई, दि.२४:
मुंबई महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांची ‘ऋणानुबंध अभियान’ या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘संयुक्त जयंती महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार, दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत भायखळा (पूर्व), वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय व उद्यान येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त बुध्द-भीम गितांचा जलसा आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती ‘ऋणानुबंध अभियान’ संस्थेचे अध्यक्ष सचिन मगरे यांनी दिली.

मुंबई महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऋणानुबंध अभियान’ या संस्थेच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील भायखळा स्थित अण्णाभाऊ साठे सभागृहात तिन्ही महापुरूषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त जयंती महोत्सवात युपीएससी आणि एमपीएससीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, महाराष्ट्रातील सामाजिक कर्तृत्व व नावलौकित मिळविलेल्या स्त्रियांचा गौरव, आफ्रीकेतील किलीमंजरो शिखर सर केलेल्या गिर्यारोहकांचा सत्कार, संदेश विठ्ठल उमप आणि रागिणी मुंबईकर यांच्यासह नामांकित गायक कलावंताच्या बुध्द-भिम गितांचा जलसा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके ९० टक्के सवलत दरात उपलब्ध केली जाणार आहेत.

वैचारिक मेजवाणी

महाराष्ट्राच्या विचारविश्वात अनेक प्रकारे क्रांतिकारी आणि पथदर्शी प्रकाशन ठरलेलेल्या चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव आणि निवृत्त मुख्य आयकर आयुक्त सुबच्चन राम यांच्या व्याख्यानाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. त्याबरोबर लोकशाहीर विठ्ठल उमप शिएटर प्रस्तुत बुध्द-भिम गितांचा जलसा सादर होणार आहे. यामध्ये संदेश विठ्ठ उमप, रागीनी मुंबईकर यांच्यासह नामवंत गायक आणि कलावंतांचा सहभाग असणार आहे.
ऋणानुबंध अभियानचा सामाजिक बांधिकिचा वसा
 
ऋणानुबंध अभियान संस्थेचे अध्यक्ष सचिन मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करत सामाजिक बांधिलकीचा वसा जपण्याचे अविरत कार्य संस्थेच्यावतीने सुरू असते. गरजू शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान, आरोग्य शिबीरे, स्वच्छता मोहीम, पर्यावरण जनजागृती यासारखा विविध उपक्रमांसह भारतरत्न डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या जनजागृतीसाठी नियमित उपक्रम राबविले जात असतात. या सामाजिक कार्यास संस्थेचे उपाध्यक्ष महेन्द्र उबाळे, वैजयंती लोखंडे, प्रकाश आक्रे, नरेन्द्र पगारे, मार्गदर्शक श्री. प्रकाश पाटील, श्री. संजय जाधव, सरचिटणीस प्रशांत जगताप, सहसरचिटणीस तुषार निकाळजे, मनिष चवरे, सचिन गायकवाड, खजिनदार अविनाश तांबेवाघ, उपखजिनदार अनिल क्षीरसागर, प्रवीण कटारे, हिशोब तपासनिस मधू हकीकर, मनोज केदारे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, अभियंता यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतात.