मेट्रो ३चा अहवाल वर्ल्ड काँग्रेस २०२४मध्ये सादर

24 Apr 2024 18:20:38

metro3


मुंबई, दि.२४ : 
महाराष्ट्र आणि मुंबईच्या शिरपेचात भूमिगत मुंबई मेट्रो ३मुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने चीन येथे झालेल्या वर्ल्ड टनेल काँग्रेस २०२४ मध्ये सहभाग घेत मुंबई मेट्रो ३चे चार केस स्टडीज सादर केले.

सोमवार दि.२२ रोजी आ प्रकल्प संचालक एस.के. गुप्ता यांनी 'वर्ल्ड टनेल काँग्रेस २०२४'मध्ये मेट्रो ३च्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक कामांविषयी, ट्रॅक क्रॉसओव्हरसाठी मोठ्या बोगद्यांची बांधणी आणि पुनर्स्थापना करताना स्थानिक अधिवासावरील परिणाम कमी करण्यासाठी एमएमआरसीद्वारे केलेले प्रयत्न याबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी, गुंतागुंतीच्या परिस्थितीला कारणीभूत असणारे विविध घटक आणि मोठ्या केव्हर्न ट्रॅक क्रॉसओव्हरच्या यशस्वी पूर्ततेसाठी वापरलेले अनेक अभियांत्रिकी पर्याय मांडण्यात आले. आंतरराष्ट्रीय टनेलिंग बिरादरीने प्रयत्नांचे कौतुक केले. जागतिक स्तरावर या प्रकल्पाचे कौतुक केले जात आहे.

तसेच,मेट्रो ३च्या बांधकामात वाहतूक आणि लॉजिस्टिक व्यवस्थापनासाठी स्टील डेकिंग आणि काँक्रिट डेकिंगच्या वापरातील साधक आणि बाधकांचा अभ्यास केला गेला आहे. मुंबई मेट्रो लाइन ३ च्या अनुभवावरील परिणाम 'वर्ल्ड टनेल काँग्रेस २०२४' मध्ये प्रकाशित करण्यात आला. पोस्टर सादरीकरणाद्वारे हा केस स्टडी सादर करण्यात आला. पर्यावरणीय, आर्थिक, बांधकाम सुलभता, अंमलबजावणीची कालमर्यादा, इत्यादी पैलूंवर गुण आणि तोटे विचारात घेण्यात आले, अशी माहिती एमएमआरसीएलने दिली.
Powered By Sangraha 9.0