सावधान! महाराष्ट्रातील कोणार्क अर्बन को बँकेवर आरबीआयचे निर्बंध! खातेदारांना…

परवाना रद्द करण्यात आलेला नाही. आर्थिक स्थिती मजबूत होईपर्यंत आर्थिक निर्बंध कायम राहणार

    24-Apr-2024
Total Views |

RBI Bank
 
 
मुंबई: उल्हासनगरमधील कोणार्क अर्बन को बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ग्राहकांना (खातेदारांना) आपले पैसै आता काढता येणार नाहीत. बँकेच्या आर्थिक परिस्थितीत बिघाड झाल्याने हे नवे निर्बंध बँकेने टाकले आहेत. खातेधारक आपले ५ लाखांपर्यंत पैसे असल्यास ते ' डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन '(DICGC) यांच्याकडे आपला दावा करू शकतात. सेक्शन ३५ ए बँकिंग रेग्युलेशन ऍक्टअंतर्गत ही कारवाई रिझर्व्ह बँकेने केली आहे.
 
२३ एप्रिलपासून बँकेवर हे निर्बंध लागू होणार आहेत. निर्बंधानंतर कंपनी कुठल्याही प्रकारची मुदतठेव स्विकारू शकत नाही अथवा कोणत्याही प्रकारचे कर्ज ग्राहकांना देऊ शकत नाही. याविषयी अधिक माहिती देताना,'बँकेची सध्याची तरलता (Liquidty) स्थिती लक्षात घेता, सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही,परंतु कर्जे सेट ऑफ करण्याची परवानगी आहे,"
 
बँकेवर निर्बंध टाकले असली तरी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द अथवा निलंबित केलेला नाही.आर्थिक स्थिती सुधारण्यात येईपर्यंत मात्र बँकेवर आर्थिक बंधने कायम राहणार असल्याचे आरबीआयने सांगितले आहे.