"संपूर्ण बॉलिवूड रेंटवर चालतंय...", आयुषमान खुरानाने केली इंडस्ट्रीची पोलखोल

24 Apr 2024 14:55:35
 
ayshman
 
 
मुंबई : अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) एक उत्तम अभिनेता, गायक आणि सुत्रसंचालक आहे. बेधडकपणे वक्तव्य करण्यासाठी देखील तो कायम चर्चेत असतो. आता नुकतेच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल फार मोठे विधान केले असून तो म्हणाला आहे की संपूर्ण बॉलिवूड रेंटवर चालत आहे. कारण बऱ्याचदा मोठ-मोठे स्टार पुरस्कार सोहळे किंवा रिएलिटी कार्यक्रमांना फार भरजरी कपडे परिधान करुन जाताना आपण पाहतो. पण कधी आपल्या मनात हा विचार आला आहे का की कलाकार आपल्या कपड्यांवर किती रुपये खर्च करत असतील. यावरच आयुषमान खुरानाने (Ayushmann Khurrana) भाष्य केले आहे.
 
आयुषमानने बॉलिवूड कलाकारांच्या लाइफस्टाइलबाबत वक्तव्य करत म्हटले, “संपूर्ण बॉलिवूड रेंटवर आहे. खरं तर कलाकार हे सगळेच कपडे विकत घेत नाहीत. तुम्हाला असं वाटतं का की आम्ही सगळे कपडे विकत घेतो? तर तसं नाही. आम्ही स्टाइलिस्टला कामावर ठेवतो. त्यांच्याकडून आम्ही रेंटवर कपडे घेतो आणि परत करतो. एवढे कपडे आम्ही कुठून आणणार?".
 
आयुषमान पुढे म्हणाला की,"मला फॅशनबद्दल जास्त माहीत नाही. मला साधी लाइफस्टाइल आवडते. पण, कामामुळे मला वेगवेगळे लूक करावे लागते. माझ्या कामाचा तो भाग आहे. माझा भाऊ अपारशक्तीचा फॅशन सेन्स चांगला आहे. तो हे काम खूप चांगल्याप्रकारे करतो. जेव्हा मी सुरुवातीला अँकरिंग करायचो तेव्हा अपारशक्तीच माझी स्टायलिंग करायचा".
Powered By Sangraha 9.0