लवकरच जिओ सिनेमाचा ॲड फ्री सबस्क्रिप्शन प्लॅन येणार

भविष्यात संपूर्ण ॲड फ्री प्लॅन कंपनीकडून घोषित होण्याची शक्यता

    24-Apr-2024
Total Views |

Jio Cinema
 
 
मुंबई: ओटीटी प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.काही दिवसांपासून जिओ सिनेमा जाहिरात मुक्त करण्यासाठी जनतेकडून मागणी करण्यात आली होती. ग्राहकांना याचा लाभ देण्यासाठी कंपनीने 'ॲड फ्री' सबस्क्रिप्शन प्लॅन आणण्याचे ठरवले आहे.सनरायझर हैद्राबाद व दिल्ली कॅपिटल यांच्या आयपीएल सामन्यादरम्यान जिओ सिनेमाने यांची घोषणा केली आहे.
 
कंपनीने याबाबत एक्सवर खुलासा करताना,'बदल ही काळानुरूप होत असतो पण तुमचा प्लॅन नाही! २५ एप्रिलपासून येत आहे....अशा आशयाची पोस्ट कंपनीतर्फे करण्यात आली होती. सध्या जिओ सिनेमाचा ९९९ रुपयांचा प्लॅन स्पेशल कंटेंट सबस्क्राईबरसाठी सुरू आहे.अधिकचे ९९ रुपये मासिक भरून 'जिओ बेस्ट ऑफ हॉलिवूड प्लॅन ' सुरू आहे. एचबीओ व इतर प्रिमियम कंटेंट सबस्क्राईबरला य योजनेचा लाभ घेता येतो. चांगल्या व्हिडिओ दर्जाच्या सोबत जास्तीत जास्त ४ डिव्हाईसवर हा कंटेंट ग्राहकांना पाहता येणार आहे.
 
या वर्षी सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज व डिस्ने यांनी विलीनीकरण जाहीर केल्याने भारतीय ओटीटी स्पर्धेत मोठी वाढ झाली आहे. टीव्ही व डिजिटल कंटेंट मधील बहुतांश मोनोपोली या विलीनीकरणामुळे शक्य झाली आहे. नवीन ॲड फ्री सबस्क्रिप्शन प्लॅनबाबत सविस्तर अधिकृत माहिती मिळाली नाही. आगामी काळात कंपनीकडून याबद्दल घोषणा होऊ शकते.