“काँग्रेसने काय वाटोळं…” आर्टीकल ३७० बद्दल शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

    23-Apr-2024
Total Views |
अभिनेते शरद पोंक्षे यांनी कॉंग्रेसला धरले धारेवर. ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचे दिले उदाहरण
 

sharad  
 
मुंबई : जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल ३७०’ (Article 370) या चित्रपटात स्वातंत्र्यापासूनचा ७५ वर्षांचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाबद्दल शरद पोंक्षे यांनी विशेष पोस्ट केली असून कॉंग्रेसने काय वाटोळं केलं हे या चित्रपटातून पाहायलाच हवं असं त्यांनी म्हटले आहे.
 
‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल ">शरद पोंक्षे म्हणतात, “नेटफ्लिक्सवर आता तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने काय पावल उचलली? काँग्रेसने काय वाटोळं केलं ते कळेल. कोणी म्हणेल की खोटा इतिहास दाखवलाय, ज्याला जे म्हणायच ते म्हणू दे पण प्रत्येकानं पाहिला पाहिजे. आणि हो मतदान मात्र नक्की करा. राष्ट्रसर्वतोपरी,” अशी फेसबुक पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली आहे.
 
‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केले होते. तर यात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तसेच, नेटफ्लिक्सवर १९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. तर कमी बजेटमध्ये निर्मिती झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आत्तपर्यंत ८० कोटींच्या पुढे कमाई केली आहे.