काँग्रेस सरकार देणार मुस्लीमांना आरक्षण!

    23-Apr-2024
Total Views |

Karnataka


बंगळुरू :
लोकसभा निवडणूक पराजय समोर दिसू लागल्यानंतर काँग्रेसने आता आणखी एक डाव खेळण्याची तयारी सुरू केली आहे. मुस्लीमांना आरक्षण देण्यासाठी कर्नाटक सरकारने संपूर्ण मुस्लीम समुदायाला मागासवर्गीय घोषित करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा तीव्र विरोध केला जात आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानेही याबद्दल कर्नाटक सरकारकडे आक्षेप नोंदविला असून यामुळे सामाजिक न्यायाची रेषा पुसट होणार असल्याचेही म्हटले आहे. कर्नाटकच्या मागासवर्ग कल्याण विभागाने एक आकडेवारी घोषित केली आहे. ज्यात राज्यात मुस्लीम वर्गातील सर्वच जातींना शैक्षणिक आणि सामाजिक दुर्बल मानण्यात आले असून त्यांना मागासवर्गातील आयआयबी कक्षेत सामील केले आहे.


NCBCने तर्फे धर्माच्या आधारे दिलेले आरक्षण हे समाजाच्या हिताचे नाही. धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही, असे न्यायालयाचेच मत असतानाही काँग्रेसतर्फे निवडणूकीपूर्वी ही खेळी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. २०११च्या जनगणनेनुसार, राज्यातील मुस्लीमांची लोकसंख्या १२.९२ टक्के इतकी आहे. यातच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केलीच आहे. शिवाय सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकांवर त्याचा प्रभाव पडू शकणार आहे. कर्नाटकमध्ये मागासवर्गीयांना एकूण आरक्षण हे ३२ टक्के दिले जात आहे. कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतल्यास या आरक्षणालाही धक्का लागू शकतो. काँग्रेस सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी दिसून येत आहे. काँग्रेसने कायम तोडा फोडा आणि राजकारण करा, ही रणनिती आखली आहे. त्यांच्याकडे कुठले नवे मुद्दे नाहीत म्हणून हा निर्णय घेतल्याचा आरोपही कर्नाटक सरकारवर करण्यात आला आहे.