मतदारांना मतदानासाठी बाहेर आणा; भाजपचे पन्नाप्रमुखांना निर्देश

    23-Apr-2024
Total Views |
voting
 
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी जास्तीतजास्त मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी पन्नाप्रमुखांना भाजपने निर्देश दिले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी पार पडले. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास ६३ टप्प्यांहून अधिक मतदान झाले आहे. मतदानाची ही टक्केवारी समाधानकारक असली तरीदेखील त्यामध्ये अधिक वाढ होणे गरजेचे असल्याचे भाजपचे मत आहे. कारण, यापूर्वी २०१९ साली पहिल्या टप्प्यात ६७.४० आणि २०१४ साली ६६ टक्के मतदान झाले होते.
 
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी भाजपच्या मुख्यालयात सोमवारी रात्री बैठक झाल्याचे समजते. या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना आणि पन्नाप्रमुखांना संदेश देण्यात आला आहे. मतदारांना घराबाहेर काढून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा, असे त्यांना सांगण्यात आले आहे.