ऑडिओबुक्सचे फायदे काय?

23 Apr 2024 16:13:08

audiobooks 
 
तर आज जागतिक पुस्तक दिन. पुस्तकांचं कौतुक जरा बाजूला ठेवत मी येतेय ऑडिओबुक्स कडे. ऑडिओबुक्स आज मोठ्या प्रमाणावर ऐकली जातायत. त्यांचं जस जस कौतुक होतंय तसं त्यावर टीकाही केली जातेय. पण खरंच का ऑडिओबुक्स ऐकण्याने वाचल्यासारखे फायदे होतात?
 
अर्थात पुस्तकातून वाचन करणे वेगळे आणि ऐकणे वेगळे. या ऑडिओबुक्स चे फायदे थोडे वेगळे आहेत. आपण ते जाणून घेणार आहोत. लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारे काही दोष असतात. आपण त्यांना दोष म्हणतो, पण ती मेंदूच्या जडणघडणातील एक पद्धत असते. आपण म्हणतो ना, आमुक अमुक मुलाला अभ्यासाचा इतका कंटाळा पण दहावीनंतर मात्र त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. मानसशास्त्राच्या भाषेत त्याला लर्निंग डिसॅबिलिटी डिसॉरर्स म्हणतात. ड्यस्लेक्सिया सारखे काही आजार असतात, अशा मुलांना ऑडिओबुक्स मदत करतात. यातून एक महत्वाची गोष्ट होते, ते म्हणजे मुलांना ऐकायची सवय लागटे. ते गुड लिस्टनर होतात. बऱ्याचदा मुलांचं चित्त थाऱ्यावर नसतं. अभ्यास करताना त्यांचं ध्यान विचलित होत, भरकटतात ते. तंद्री लागते. हेही मेंदूत एकाच वेळी होणाऱ्या अनेक घडामोडींचे लक्षण. ती काही मुलांची चूक नसते. पण या वेळेचा विपर्यास होण्यापासून ऑडिओबुक्स वाचवू शकतात. कुणीतरी कानातच काही बोलतंय म्हंटल्यावर एकाग्रतेने ती ऐकतात. एक अजून गोष्ट म्हणजे एकाचवेळी ती अनेक गोष्टी करू शकतात, मल्टिटास्कन्ग. आता हे करणे बरोबर कि चूक ते सांगता येत नाही. मुले पुढे कोणते करियर निवडणार आहेत, त्यासाठी त्यांनी एकाग्र असले पाहिजे की एकाचवेळी अनेक कामे करण्याची सवय त्यांना असायला हवी हे ठरते.
 
आता मुलांसाठी ऑडिओबुक्सचे फायदे झाले. आता एक गम्मत सांगते. आपण ऑडिओबुक्स वाचतो असे का म्हणतो? ऐकतो असे का म्हणत नाही? कारण आपण ती वाचतच असतो. नवी माहिती मेंदूला उपलब्ध करून देताना खूप मोठमोठ्या प्रक्रिया मेंदूत घडत असतात. त्या माहितीचे विभाजन, ती माहिती कोणत्या स्मरण कक्षात ठेवायची हे ठरवणे सेन्सॉरी मोटर चे काम असते. वाचताना तुम्हाला मेंदूंतील या सर्व कामांसोबत अजून काही जास्तीची कामे करावी लागतात ती म्हणजे शब्द पाहणे, त्यांचे वाचन करणे, त्यांचं अर्थ लावणे आणि मग ही सर्व एकत्रित माहिती मेंदूकडे पाठवणे. ऑडिओबुक्स मध्ये ही सर्व प्रक्रिया करावी लागत नाही. तुम्ही जेवढा मजकूर वाचता तो जर ऐकायचा म्हंटलं तर त्यासाठी गुणिले ९ इतका कमी वेळ लागतो!
 
आई लहानसताना गोष्ट अंगयची झोपताना आणि आपण ऐकता ऐकता झोपी जायचो? हो. आता आईसोबत आपण झोपत नसलो तरीही ही गोष्ट ऐकत झोपण्याची सवय आपण ठेवूच शकतो. पुन्हा डोळ्यांना आराम, डोकं दुखणे नाही, एकाच अवस्थेत खूपवेळा बसणे नाही. एखाद्या शब्दाचा उच्चर कसा करावा हेही आपण यातून शिकू शकतो.
 
तशीही आपली संस्कृती मौखिक स्वरूपाचीच होती. आपण ऐकायचो, लक्षात ठेवायचो आणि पुढील पिढीलाही सांगायचो. तीच संस्कृती पुन्हा रुजतेय असे म्हणूया?
 
हे झाले मुलांसाठीचे फायदे असेच मोठ्यांसाठी सुद्धा आहेत. कार चालवताना तुम्हाला कादंबऱ्या ऐकायला आवडतात का? मग पुढचा व्हिडीओ तुमच्यासाठी असेल.
Powered By Sangraha 9.0