“करा ओ लगीन घाई”, अनंत-राधिकाच्या लग्नाचा भव्य मंडप ‘या’ ठिकाणी सजणार

23 Apr 2024 17:47:58

radhika  
 
 
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani Radhika Merchant) लवकरच राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधणार आहे. १ ते ३ मार्च दरम्यान त्यांचा प्रीवेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे जगभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. आता अनंत अंबावी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांचं लग्न कुठे होणार हे समोर आले आहे.
 
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा लग्नसोहळा जुलैमध्ये लंडनमधील एका भव्य ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधील त्यांच्या स्टोक पार्क इस्टेटमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा कार्यक्रम होणार असून या सगळ्याची तयारी नीता अंबानी पाहत आहेत.
 
अनंत राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्यात कला, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच, बरेच आंतरराष्ट्रीय पाहूणे देखील अनंत आणि राधिकाला आशिर्वाद आणि त्यांच्या नव्या आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
Powered By Sangraha 9.0