कौशल्य विकास आणि व्यवसायभिमुख शिक्षण देणारी जन शिक्षण संस्थान रायगड

    23-Apr-2024
Total Views |
ेम्े
 
‘जन शिक्षण संस्थान रायगड’ची स्थापना सरकारच्या ‘सोसायटी रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट, १८६०’ च्या मार्गदर्शक तत्वानुसार झाली असून ‘जन शिक्षण संस्थान, रायगड’ ही संस्था कौशल्य विकास व उद्योेजकता मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत (पूर्वाश्रमीचे श्रमिक विद्यापीठ) यांच्यामार्फत व्यवसायाभिमुख शिक्षण प्रशिक्षण राबवित असते. या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख... 
 
जन शिक्षण संस्थान रायगड’ ही भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, माध्यमातून राबविली जाणारी एक योजना असून, सुमारे ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९६७ साली ‘श्रमिक विद्यापीठ’ या नावाने ही योजना सुरू झाली. त्यानंतर सदर योजनेची गरज व तीव्रता लक्षात घेऊन २००२ साली संपूर्ण भारतात २७१ समाजसेवी संस्थांची निर्मिती झाली व ‘श्रमिक विद्यापीठ’ हे नाव बदलून ‘जन शिक्षण संस्थान रायगड’ असे नामांतर करण्यात आले. त्यापैकी आज २४८ जन शिक्षण संस्थानांची भारत सरकारच्या www.jss.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
 
भारत सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्याचे व पाठपुरावा करण्याचे कामदेखील ‘जन शिक्षण संस्थान रायगड’ सातत्याने करीत आहे. त्याचबरोबर जीवन मूल्य शिक्षणाचा एक भाग म्हणून महिला सक्षमीकरण, प्रदूषण, यशाची गुरुकिल्ली, टाकाऊपासून टिकाऊ, बचत, विमा गुंतवणुकीचे महत्त्व, ऐकण्याचे कौशल्य, संवाद कौशल्य, परस्पर संबंध, वैयक्तिक व सांघिक सफलता, गट कार्य, बचत गट मार्गदर्शन, विक्री व पॅकिंग कौशल्य, उद्योजकता विकास, प्रस्ताव बनविणे व व्यवसाय मार्गदर्शन इ. मार्गदर्शनदेखील ‘जन शिक्षण संस्थान’ करत असते. सदर प्रशिक्षणामध्ये लोकांना स्वत:च्या पयावर उभे करण्यासाठी व स्वयंरोजगार उपलब्धीसाठी प्रामुख्याने दारिद्य्ररेषेखालील निरक्षर, नवसाक्षर, अपूर्ण खंडित शालेय शिक्षण असणारे अकुशल कामगार आणि अनुसूचित जाती - जमाती, मागासवर्गीय अशा समाजातील सर्व स्तरातीलव्यक्तींना लाभ करून दिला जातो. ना वयाची अट, ना शिक्षणाची अट, ‘तंत्रज्ञान शिका झटपट’ या वाक्याला अनुसरून व गाव तिथे प्रशिक्षण हे ध्येय समोर ठेवून प्रत्येक स्त्री-पुरुषाला व्यवसाय प्रशिक्षणाची समान संधी दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाले की, यशस्वी प्रशिक्षणार्थींना भारत सरकार पुरस्कृत ‘जन शिक्षण संस्थान रायगड’चे प्रमाणपत्र दिले जाते. 
 
संस्थेने २००४ ते २०२२ या १८ वर्षांच्या कालावधीत आजपर्यंत एक हजारांपेक्षा ही अधिक गावांमध्ये विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांमधून अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व इतर वर्गातील ४० हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केलेले आहेत. त्यात २० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठीच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘साक्षर भारत राष्ट्रीय साक्षरता पुरस्कार २०१६’ व स्वच्छता अभियानासाठीच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘स्वच्छता राष्ट्रीय पुरस्कार-२०१८‘ सर्वोत्कृष्ट शिक्षणासाठी ‘साधनव्यक्ती कौशल्याचार्य पुरस्कार २०१९’ मिळवणारी ‘जन शिक्षण संस्थान रायड’ ही जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, रत्नप्रभा बेल्हेकर, नरेन जाधव, प्रा. अविनाश ओक, नीला तुळपुळे, गीतांजली ओक, संचालक विजय कोकणे तसेच सर्व बोर्ड मेंबर्स यांचे मार्गदर्शनाखाली संस्थस विविध उपक्रम राबवते. ‘युवक प्रतिष्ठान’ मुंबई ही ‘जन शिक्षण संस्थान’ रायगड’ची पालक संस्था आहे. ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून विविध लहान मोठ्या सामाजिक संस्थांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शनपर सहकार्य करते आहे.
-डॉ. विजय कोकणे
-९८१९८५४३०८