१० लाख कोटी करपूर्व नफा करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिली भारतीय कंपनी

23 Apr 2024 11:27:39

Reliance
 
 
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ही कंपनी करपूर्व १० लाख कोटींचा नफा करणारी पहिलीच भारतीय कंपनी ठरली आहे. रिलायन्स कंपनीच्या रिटेल टेलिकॉम गॅस या रिलायन्स उपकंपन्याचे निकाल काल संध्याकाळी जाहीर करण्यात आले होते. कंपनीच्या एकत्रित महसूलात १० लाख कोटीहून अधिक वाढ झाली आहे.
 
या तिमाहीत कंपनीला ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीला सात टक्क्यांनी नफा वाढत ७९०२० कोटी नफा झाला होता. कंपनीला करपूर्व नफा १६.१ टक्क्यांनी वाढला आहे.मार्च ३१ पर्यंत हा नफा (EBITDA) १.७९ लाख कोटींवर पोहोचला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकत्रित नफा १८९५१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा यावर्षी नफ्यात घट झाली आहे.
 
ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात कंपनीला १७२६५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत कंपनीला (१ वर्षांचा) निव्वळ नफा ६६७०२ कोटी झाला होता.१० लाख कोटी उलाढाल (turnover) पूर्ण करणारी रिलायन्स ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली आहे.ऑइल टू केमिकल ( O2C) रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नफ्यात वाढ झाली आहे. 
 
Powered By Sangraha 9.0