डीपफेक व्हिडीओ प्रकरणी रणवीर सिंगची पोलिसांत धाव

    23-Apr-2024
Total Views |
अभिनेता रणवीर सिंग हा देखील नुकताच डीपफेक व्हिडिओचा बळी पडला असून त्याने न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
 

ranveer  
 
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे डीपफेक व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. रश्मिका मंदाना, काजोल, कटरिना कैफ, आमिर खान यांच्यापाठोपाठ रणवीर सिंग (Ranvir Singh Deepfake Video) देखील डीपफेकचा बळी ठरला होता. या व्हिडिओत त्याने कॉंग्रेसचा प्रचार केल्याचे दाखवण्यात आले होते.
परंतु, हे सर्व खोटं असून यासंदर्भात रणवीरने (Ranvir Singh Deepfake Video) थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रणवीर सिंगने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रार नोंदवली. रणवीर एआय मार्फत बनवलेल्या डीपफेक व्हिडीओत तो राजकीय पक्षाचं समर्थन करताना दिसत असून त्याचा हा व्हिडीओ वाराणसी दौऱ्यावेळी शूट झालेल्या व्हिडीओपासून तयार केला गेला होता. दरम्यान, रणवीरने तक्रार दाखल करण्याआधी सोशल मीडियावर पो ‘डीपफेकपासून सावध राहा, मित्रांनो’ असे लिहिले होते.
 
रणवीर सिंगच्या प्रवक्त्याने तक्रारीबद्दल अधिक माहिती देत सायबर क्राइम सेलकडून पुढील तपासासाठी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे. “होय, आम्ही पोलीस तक्रार दाखल केली आहे आणि एआयच्या मदतीने तयार केलेला रणवीर सिंगचा डीपफेक व्हिडीओ शेअर करणाऱ्या हँडलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे,” असे प्रवक्त्याने म्हटले.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता आमीर खान याचाही राजकीय पक्षाचा प्रचार करतानाचा खोटा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. त्यानेही मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रारही केली होती. आमीरचा हा व्हिडीओ ‘सत्यमेव जयते’ च्या एका एपिसोडमधून एडिट करून तयार करण्यात आल्याचे सत्य देखील समोर आले होते.