आरबीआयने सोवरीन गोल्ड बाँडचा परतावा दर केला निश्चित प्रति युनिट ७३२५ रुपये मिळणार

23 Apr 2024 14:47:39

SGB
 
 
मुंबई: सोवरीन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) गुंतवणूकीत मूदतपूर्व परतावा हवा असल्यास रिझर्व्ह बँकेने परतावा किंमत (Redemption Price) घोषित केली आहे. २३ एप्रिलपासून गुंतवणूकदारांना परतावा हवा असल्यास प्रति युनिट ७३२५ रूपये मिळणार आहेत.
 
२३ एप्रिलपासून लागू होणारा परतावा किंमत ७३२५ रूपये प्रति युनिट असणार असे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दिनांक १८,१९,२२ एप्रिल २०२४ पासून ही परतावा किंमत लागू असणार आहे. एसजीबी (Sovereign Gold Bond) हे प्रत्यक्ष सोने नसून सोने गुंतवणूकीचे एक साधन आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना हे रोखे देऊन बाँड खरेदी करावे लागले होते. मुदत संपल्यानंतर लागू झालेल्या किंमतीचा परतावा गुंतवणूकदारांना मिळणार आहे. यासाठी गुंतवणूकदारांना मुदतपूर्व गुंतवणूक काढून घ्यायची असल्यास ७३१५ रुपयांनी हा परतावा दर ग्राहकांना मिळेल.
 
एसजीबी या सरकारी बाँड गुंतवणूक योजनेत पाच वर्षांनी रक्कमेचा परतावा मिळणार असल्याचे १४ जानेवारीला आरबीआयने परिपत्रक काढले होते. नोव्हेंबर २०१५ मध्ये ही योजना आरबीआयने ग्राहकांसाठी आणली होती. प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक न करता सोन्याची गुंतवणूक आर्थिक उत्पादनात गुंतवण्यासाठी ही योजना आणली गेली होती. या गुंतवणूकीत बाँडची किंमत भारतीय रुपयात निश्चित असते.
 
गेल्या तीन दिवसांतील सोन्याच्या दराच्या व्यवसायिक किंमतीची सरासरी काढत ही रक्कम आरबीआयने निश्चित केली आहे. त्यानुसार १८,१९,२२ ची सरासरी किंमत काढत आरबीआयने ही ७३२५ रुपये किंमत ठरवली आहे.पुढील परतावा किंमत १६ एप्रिलपासून ठरवण्यात येणार आहे. ज्यामध्ये ७२६० रूपये किंमत परतावा गुंतवणूकदारांना मिळणार आहे. एसजीबी योजना २००६ Government Security Act अंतर्गत तयार केली गेली होती.
 
बाँड हे प्रति ग्रॅम सोने या दराने मोजले जातात. गुंतवणूकदारांना कमीत कमी १ ग्रॅम सोन्याच्या गुंतवणूकीची मर्यादा असते. एका आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त ४ किलो सोन्याच्या बाँड मध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना मूदतपूर्व परतावा मिळत असल्याने ग्राहकांकडे गरजेला तरलता (Liquidty) मिळते.
 
Powered By Sangraha 9.0