मुमताजने आळवला पाकचा सूर! म्हणे, "पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी हटवा!"

    23-Apr-2024
Total Views |
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ भाष्य केले आहे.
 

mumtaz  
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ५०-६० दशकांचा काळ गाजवणारी अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी पाकिस्तानाचे समर्थन केले आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारताच बंदी असून यावर त्यांनी भाष्य करत त्यांना भारतात पुन्हा कला सादर करण्याची परवानगी द्यावी असे म्हटले आहे. मुमताज (Mumtaz) पाकिस्तानला नुकत्याच गेल्या होत्या, तिथे त्यांनी गुलाम अली, राहत फतेह अली खान, फवाद खान यांसारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांबरोबरचे फोटो पोस्ट केले होते. आणि याचसोबत त्यांनी पाकिस्तानी कलाकारांवरील भारतातील बंदी हटवली पाहिजे, त्यांना इथे येऊन आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे, असे म्हटले आहे.
 

mumtaz  
 
मुमताज यांनी पाकिस्तानी कलाकारांबद्दल बोलताना म्हटले की, “पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊन काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. ते प्रतिभावान आहेत. मला माहित आहे की मुंबईतील आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही, पण त्यांनाही संधी मिळायला हवी.” मुमताज यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु असून पुढे या प्रकरणात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. २०१६ साली झालेल्या उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात त्यांची कला सादर करण्यावर बंदी घालण्यात आली होती. यावरच मुमताज यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.