"माझ्या मुलीची हत्या 'द केरळ स्टोरी'च्या शैलीत झाली. हिंदू मुलींना अडकवण्याचे मोठे षडयंत्र सुरू"; काँग्रेस नेत्याचा खुलासा

    23-Apr-2024
Total Views |
 neha hiremath
 
बंगळुरू : कर्नाटकातील हुबळी येथील काँग्रेस नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिच्या हत्येबाबत तिचे वडिलांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. टाईम्स नाऊशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'द केरळ स्टोरी'च्या शैलीत त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. निरंजन हिरेमठ यांनी टाईम्स नाऊला सांगितले – “माझ्याकडे एक गुप्त अहवाल आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की माझ्या मुलीची केरळ स्टोरी शैलीमध्ये हत्या करण्यात आली आहे. हिंदू मुलींना अडकवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे.
 
अँकर पद्मा जोशी यांनी टीव्ही चॅनलवर काँग्रेसच्या नगरसेवकाला विचारले की ते कोणत्या कारस्थानाबद्दल बोलत आहेत. यावर निरंजन म्हणाले की, हे एका प्रकारच्या माफियांचे काम आहे, जे मुलींना अडकवतात. ही काही एका दिवसाची गोष्ट नाही. वर्षानुवर्षे हे होत आहे. केरळमध्ये लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, पूर्वी ज्या घटना इतर राज्यांमध्ये घडत होत्या त्या आता कर्नाटकात घडत आहेत. तिथून लोक इथे सक्रिय झाले आहेत. येथे लोकांना भडकावून हे सर्व केले जात आहे.
 
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, “या हत्येत कोण्या एका व्यक्तीचा सहभाग नव्हता. तो (फयाज) माजी विद्यार्थी होता. त्याला आतून माझ्या मुलीची माहिती दिली जात होती. "माझी मुलगी कुठे होती, ती कोणत्या वर्गात होती, जेव्हा ती गाडी बसत होती तेव्हा त्याला सांगितले जात होते." १० दिवसातील कॉलेज परिसरातील फुटेज पाहून सर्व माहिती गोळा करत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतचं सीबीआयला सुद्धा हे फुटेज पाहण्याची विनंती त्यांनी केली आहे.
 
त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलीला समजले की ते तिला अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, म्हणून तिने प्रस्ताव नाकारला होता, परंतु तरीही तिच्यावर दबाव आणला जात होता. यामध्ये फयाजचे पालक तसेच त्याच्या समाजातील लोकांचा समावेश होता. ते म्हणाले की, त्यांची मुलगीही फयाजला घाबरत होती, पण तिने हे कधीच घरी सांगितले नाही. फक्त माझ्या आईला सांगितले की एक कॉलेजमधील मुलगा आहे जो तिला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला कॉल करत आहे.
 
काँग्रेसच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने त्यांना या सर्व गोष्टींची माहिती दिली, त्यानंतर त्यांना समजले की लोक त्यांच्या मुलीचे धर्मांतर करण्यासाठी त्यांच्या मागे लागले होते आणि आता तिची हत्या करण्यात आली आहे, ते तिच्या कॉलेजचे फोटो शेअर करत आहेत तिची बदनामी करण्यासाठी, असा आरोप हिरेमठ यांनी केला.