भारतीय अर्थव्यवस्था टॉप गिअरवर ! गेल्या १४ वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वाधिक वाढ

एचएसबीसी फ्लॅश कंपोझिट पीएमआय इंडेक्सची माहिती पुढे आली. जून २०१० नंतर एप्रिल २०२४ मध्ये अर्थव्यवस्थेत सर्वाधिक वाढ

    23-Apr-2024
Total Views |

Indian Economy
 
 
मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था टॉप गिअरवर असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. एचएसबीसी फ्लॅश कंपोझिट पीएमआय इंडेक्स (HSBC Flash India Composite PMI output Index) या सर्व्हेक्षणात म्हटल्याप्रमाणे, मार्चमधील पीएमआय आऊटपुट इंडेक्समध्ये मार्च महिन्यातील ६१.८ वरून एप्रिल महिन्यात ६२.२ वर वाढ झाली आहे. जून २०१० नंतर गेल्या १४ वर्षातील ही सर्वाधिक वाढ असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.
 
खाजगी क्षेत्रातील मोठ्या मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी वाढ झाल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे. मार्चमध्ये झालेल्या वाढीचा वेग एप्रिलमध्ये अधिक वाढला गेला आहे. एप्रिल महिन्यात विक्रीत मोठी वाढ झाल्याने ही वाढ झाल्याचे या अहवालाने आपल्या निष्कर्षात म्हटले आहे.एस अँड पी ग्लोबलने प्रकाशित केलेल्या या अहवालात जून २०१० नंतर प्रथमच एप्रिल २०२४ मध्ये हा दर ६२.२ गेला असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीत असल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे.
 
या अहवालात ५० हून अधिक आकडा असल्यास तो विकास वाढल्याचे चिन्हांकित केले जाते व ५० खाली आकडा असल्यास अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला असल्याचे यात गणले जाते. ४०० उत्पादन क्षेत्रातील व ४०० सेवा पुरवणारे सेवादार यांच्या आधारे हा सर्व्ह करण्यात आला होता.
 
आकडेवारीत भारत देश हा वेगवान अर्थव्यवस्था म्हणून समोर येत असतानाच आरबीआयने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अर्थव्यवस्था ७ टक्क्याने वाढेल असे अनुमान व्यक्त केले होते. याशिवाय सरकारने ७.३ ते ७.६ टक्क्यांनी अर्थव्यवस्था वाढेल असेही भाकीत केले होते.
 
या निष्कर्षावर बोलताना एचएसबीसीचे मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजूल भंडारी म्हणाले "नवीन ऑर्डर वाढल्यामुळे उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांतील मजबूत कामगिरीमुळे जून२०१० पासून सर्वोच्च संमिश्र उत्पादन निर्देशांक प्राप्त झाला. विशेषत:, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन ऑर्डर वाढल्यामुळे एप्रिलमध्ये सेवांच्या वाढीला आणखी वेग आला," असे म्हटले.
 
याशिवाय अहवालात म्हटल्याप्रमाणे, आंतरराष्ट्रीय विक्रीने एकूण ऑर्डर बुक्समध्ये सकारात्मक योगदान दिले आहे. या अहवालाप्रमाणे, महागाई दरात इतक्या लगेच घट होण्याची चिन्हे नसल्याने तूर्त व्याजदर कपात करण्याची शक्यता नाही.पुढील वाढीव काळाकरीता रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्के मर्यादेहुन अधिक महागाई दर राहू शकतो.