इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर

नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

    23-Apr-2024
Total Views |

ima photo
 
कल्याण : इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारपदासोबतच नव्या विश्वस्त, कार्यकारिणी समिती सदस्य, राज्य आणि केंद्रीय प्रतिनिधींचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली.
आपल्या सामाजिक उपक्रम आणि कार्यांमुळे जनमानसात इंडीयन मेडीकल असोसिएशनने
नावलौकिक मिळवलेला आहे . कल्याणातील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. कडोंमपा आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड आणि आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्या प्रमूख उपस्थितीत हा शानदार सोहळा संपन्न झाला. आयएमए कल्याणच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.‌ ज्यामध्ये नव्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. सुरेखा ईटकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली.
 अशी आहे कार्यकारिणी
संस्थेच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे यांच्याकडून डॉ. सुरेखा ईटकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. तर उपाध्यक्षपदी डॉ. सोनाली पाटील, सचिवपदी डॉ. शुभांगी चिटणीस, सहसचिवपदी डॉ. राजेश राजू, खजिनदारपदी डॉ. विकास सुरंजे यांची नियुक्ती करण्यात आली.
आयएमएच्या या प्रमुख पदांसह विश्वस्त म्हणून डॉ. प्रदीप कुमार सांगळे, डॉ. राजन माने, डॉ. नरेंद पाठक, कार्यकारिणी समिती सदस्यपदी डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. तन्वी शहा, डॉ. दीप्ती दिक्षीत, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. मनोज पाटील आणि डॉ. राहुल तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच राज्यस्तरीय सदस्यपदी डॉ. संजय गोडबोले, डॉ. विवेक भोसले, डॉ. प्रशांत खताळे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विक्रम जैन यांची आणि केंद्रीय सदस्यपदी डॉ. प्रदीपकुमार सांगळे, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. प्रविण भुजबळ, डॉ. स्नेहलता कुरीस आणि डॉ. राजन माने यांच्या नावांची यावेळी घोषणा करण्यात आली. तर वेब आणि बुलेटिन संपादकपदी डॉ. अभिजीत सिंह यांचे नाव जाहीर करण्यात आले.
कोवीड काळात केलेल्या कामामुळे तसेच गेल्या काही वर्षांत शहरासाठी राबवलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे इंडीयन मेडीकल असोसिएशनने कल्याणकरांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. कल्याण शहराच्या भल्यासाठी आणि कल्याण शहराचे नाव देशपातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठराविक संस्थांपैकी आयएमए कल्याण ही प्रमूख संस्था आहे. विशेषतः काही दिवसांपूर्वीच अतिशय उत्साही आणि थाटात साजऱ्या झालेल्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यशस्वी आयोजन करून आयएमए कल्याणने मैलाचा नवा दगड रचला आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कल्याण दिवाणी वकील संघटनेचे ॲड. जयदीप हजारे, रोटरी क्लबचे विजय वैद्य यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांचे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.