IPO Update: गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी ! आजपासून JNK India चा आयपीओ बाजारात दाखल

२३ ते २५ एप्रिलपर्यंत आयपीओ खुला राहणार

    23-Apr-2024
Total Views |

IPO
 
 
मुंबई: जेएनके इंडिया (JNK India) कंपनीचा आयपीओ आज बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहेत.२३ ते २५ एप्रिल दरम्यान हा आयपीओ (Initial Public Offer) असणार आहे. कंपनी या आयपीओमधून ६५० कोटींचा निधी उभारणार आहे. कंपनी एकूण ३०० कोटींचे समभाग (Shares) गुंतवणूकीसाठी उपलब्ध करणार आहे. ऑफर फॉर सेल (OFS) साठी ३४९.४७ कोटीचे समभाग उपलब्ध असतील.
 
कंपनीने प्राईज बँड प्रति समभाग ३९५ ते ४१५ रुपये निश्चित केला आहे. कमीतकमी एक गठ्ठा ३६ समभागाचा असणार आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी १४४९० कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे. याशिवाय कमीत कमी १४ गठ्ठा (Lot) खरेदी करावे लागणार आहेत.
 
पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २६ एप्रिलला होणार आहे. अपात्र गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा (Refund) २९ एप्रिलपासून मिळण्याची शक्यता आहे. ३० एप्रिलपासून कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत (Listed) होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, एकूण समभागांपैकी २० टक्के समभाग वाटप पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांना १५ टक्के व अँकर गुंतवणूकदार (Private Investors) यांना ३० टक्के होणार आहे.
 
आयपीओसाठी आयआयएफएल सिक्युरिटीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज या बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत तर लिंक टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रार म्हणून आयपीओसाठी काम पाहणार आहे. कंपनीचे प्रमोटर अरविंद कामत, गौतम रामपेली, दिपक भरुका हे आहेत.
 
जे एन के कंपनी २०१० साली स्थापन झाली होती. कंपनी हिटरच्या उत्पादन, डिझाईन, इंस्टागलेशन अशा विविध उत्पादने व सेवा पुरवते. कंपनीने या आधी आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथे कामे केली आहेत.
 
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या आयपीओतील जमा केलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी केला जाणार आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) २३०८.२७ कोटी रुपये आहे.