वोडाफोन आयडिया एफपीओला तुडुंब प्रतिसाद

६ पटीने अधिक इश्यू सबस्क्राईब झाला

    23-Apr-2024
Total Views |

Vi
 
 
 
मुंबई: वोडाफोन आयडियाने आपल्या भावी गुंतवणूकीसाठी १८००० कोटी रुपयांचा एफपीओ (Follow on Public Offer) निधी उभारणी केली आहे.एफपीओ पूर्णपणे भरला असून परदेशी गुंतवणूकदार,खाजगी गुंतवणूकदार,किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने शेवटच्या दिवशी एफपीओ संपूर्णपणे सबस्क्राईब झाला आहे.
 
शेवटच्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला एफपीओला ८०.१२ अब्ज ब डॉ मिळाल्या होत्या. एकूण समभाग विकण्यासाठी ठेवलेल्या किंमतीपेक्षा त्या ६ पटीने जास्त असल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. कंपनीने प्राईज बँड १० ते ११ रुपये प्रति समभाग निश्चित केला हो. मर्चंट बँकरने दिलेल्या माहितीनुसार सातवेळा हा एफपीओ सबस्क्राईब झाला आहे.
 
एकूण आलेल्या बिडिंगपैकी ६५ टक्के वाटा परदेशी गुंतवणूकदारांनी दिला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांनी १९.३१ वेळा बिडिंग केली होती. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४.५ वेळा बिडींग मिळाली होती.उर्वरित १५ टक्के विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) व उर्वरित किरकोळ गुंतवणूकदारांसाठी समभाग (Shares) राखीव होते.या गुंतवणूकीव्यतिरिक्त अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांकडून कंपनीने प्रति समभाग ११ रुपये प्रमाणे ५४०० कोटींचा निधी उभारला होता.गेल्या काही वर्षांतील झालेल्या एफपीओला हा सर्वोत्तम प्रतिसाद मिळाल्याचे तज्ञांनी मत मांडले आहे.
 
एप्रिल १८ ते २२ पर्यंत हा एफपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. आज समभागांचे वाटप निश्चित होणार असून गुंतवणूक आपल्या गुंतवणूकीची अपडेट Link Intime India Private Limited या संकेतस्थळावर पाहू शकतात.