अदानी समुहातील परदेशी गुंतवणूकदार सेबीच्या रडारवर !

सेबी अँक्शन मोडमध्ये येणार?

    23-Apr-2024
Total Views |

Adani
 
मुंबई: अदानी समुहातील गुंतवणूकदार सेबीच्या रडारवर असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. या माहितीप्रमाणे अदानी समुहाच्या परकीय देशातील गुंतवणूकदारांनी सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका सेबी ठेवणार असल्याचे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना या प्रकरणी माहिती दिली आहे. नाव न छापण्याच्या अटीवर सुत्रांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
 
अदानी समुहाच्या गुंतवणूकदारांनी कथित परदेशी गुंतवणूकीचे नियम मोडले असून गुंतवणूकीची मर्यादाही ओलांडली असल्याचा दावा सेबी करत असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे सेबी अदानी समुहावर चौकशी मार्फत दंडात्मक कारवाई करेल का हा उद्योग विश्वात चर्चचा विषय बनला आहे. 'रॉयटर्स ' या वृत्तसंस्थेने यासंबंधीची बातमी प्रथम दिली होती. या विषयी सेबी अधिक तपास करत असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले होते.
 
या वर्षाच्या सुरूवातीला अदानी समुहाशी संबंधित असलेल्या १२ परदेशी गुंतवणूकदारांना नोटीस धाडली होती. त्यावेळीही गुंतवणूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ही नोटीस नियामक मंडळाने पाठवली होती. यासंबंधीची एकूण गुंतवणूकीचा तपशिल जाणून घेण्यासाठी सेबी प्रयत्न करत आहे.सुत्रांनी वृत्तसेवेला सांगितल्याप्रमाणे,एकूण गुंतवणूकदारांपैकी आठ गुंतवणूकदारांनी 'दंड म्हणून पैसे भरण्याची' तयारी दर्शवली आहे.
 
यापूर्वी सेबीला अदानी समुहाच्या १३ विदेशी गुंतवणूकदार (Foreign Portfolio Investors) आपल्या गुंतवणूकीची अधिक माहिती सेबीला देऊ शकले नव्हते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार यातील Albula Investment Fund, cresta Fund, MGC Fund, Asia Investment Corporation,APMS Investment Fund, Elara India Opportunities Fund,Vespera Fund, LTS Investment Fund या कंपन्यांनी सेबीला 'सेटलमेंट ' साठी पाचारण केले होते.
 
या आधीच्या संस्थांव्यतिरिक्त Emerging India Focus Funds, EM Resurgent Fund, Polis Global Fund, New Leaina Investment, Opal Investments या संस्थाही चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
सेबीला चौकशीत सर्वाधिक मोठा अडथळा हा नक्की गुंतवणूकीचा लाभार्थी कोण व आणि त्या गुंतवणूकीचा अदानी समुहाचा काय संबंध या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी होत आहे. त्यामुळे आगामी नजीकच्या काळात सेबीकडून या कथित नियमन उल्लंघनप्रकरणी अधिक चौकशी होण्याची शक्यता आहे.