निवृत्तीवेधनधारकांना हयातीचे दाखले सदर करण्यास ६ मेपर्यंत मुदत

23 Apr 2024 20:05:44

bmc


मुंबई, दि.२३: प्रतिनिधी : 
दि. ०१ नोव्‍हेंबर २०२३ ते दिनांक ०५ मार्च २०२४ या कालावधीत हयातीचे दाखले सादर न करणा-या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सोमवार, दिनांक ०६ मे पर्यंत हयातीचे दाखले बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन – आय.बी.) विभाग येथे ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत अथवा, केंद्र शासनाच्‍या ‘जीवनप्रमाण'या संकेतस्‍थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्‍तवेतनधारकांच्‍या हयातीच्‍या दाखल्‍यांबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्‍या आहेत. त्‍यानुसार, निवृत्तीवेतनधारकांनी पूर्णतः भरलेले हयातीचे दाखले ऑफलाईन पद्धतीने प्रमुख लेखापाल (कोषागार) कार्यालय, लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन - आय.बी.) विस्‍तारित इमारत, पहिला मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर सादर करावेत अथवा, केंद्र शासनाच्‍या ‘जीवनप्रमाण’ (www.jeevanpramaan.gov.in) या संकेतस्‍थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. दि. ०६ मेपर्यंत हयातीचे दाखले ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने प्राप्‍त न झाल्‍यास मे, २०२४ पासूनचे निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तात्पुरत्‍या स्‍वरूपात स्थगित करण्यात येईल, याची संबंधीतांनी कृपया नोंद घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्‍यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0