मोठी बातमी: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड Q4 Results: निव्वळ नफ्यात २ टक्क्यांनी घट एकूण निव्वळ नफा १८९५१ कोटीवर

भागभांडवल धारकांना संचालक मंडळाने १० रुपयांचा लाभांश जाहीर केला

    23-Apr-2024
Total Views |

Reliance
 
 
मुंबई: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपला चौथ्या तिमाहीचा आर्थिक निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या निव्वळ नफ्यात २ टक्क्याने घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ कंपनीला निव्वळ नफा १८९५१ कोटी रुपयांचा झाला आहे.मागील आर्थिक वर्षात कंपनीला १९२९९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीच्या कारभारातून महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ११ टक्क्यांनी वाढ होत २.४ लाख कोटींचा महसूल मिळाला आहे.
 
कंपनीचा ईबीआयटीडीए (Earning before Interest Tax Depreciation Amortization) (करपूर्व व इतर खर्च पूर्वनफा) १३ टक्क्यांनी वाढत ४७१५० कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षात ईबीआयटीडीए ४४६७८ कोटींवर पोहोचला आहे. ईबीआयटीडीए मार्जिनमध्ये १७.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ साठी १० रुपयांचा लाभांश (Dividend) भागभांडवल धारकांना जाहीर केला आहे. मागील वर्षी कंपनीने ९ रूपये प्रति समभाग लाभांश दिला होता. कंपनीचा महसूलात ६ टक्यांने वाढ झाली आहे.
 
विभागवारी - कंपनीला ऑईल ते गॅस (O2C) कंपनीच्या एकूण महसूलात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकत्रितपणे
(Consolidated) कंपनीचा महसूल १.४२ लाख कोटीवर पोहोचला आहे. यातील इबीटीडीएत इयर ऑन इयर बेसिसवर ३ टक्क्यांनी वाढ होत उत्पन्न १६७७७ कोटीवर पोहोचले आहे.
 
जिओ कंपनीला ऑपरेटिंग महसूलात १३ टक्यांने वाढ होत २८८७१ कोटीवर महसूल उत्पन्न पोहोचले आहे. रिलायन्स रिटेल कंपनीचे एकूण महसूल ३.०६ लाख कोटी वर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसूल उत्पन्न १७.८ टक्क्यांनी वाढले आहे.रिटेल कंपनीच्या ईबीआयटीडीए (EBITDA) १८ टक्क्यांनी वाढत ५८२३ कोटी रूपयावर पोहोचला आहे.रिलायन्स रिटेल आर्मचा नफा १०००० कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
कंपनीच्या तेल गॅस कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या मिडिया व नवीन बिझनेसला आर्थिक उलाढालीतून इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ६३ टक्क्यांनी वाढ होत. महसूल उत्पन्न २४१९ कोटींवर पोहोचले आहे. न्यू बिझनेस (टीव्ही डिजिटल सर्विसेस) चा उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर २५ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
एकूण महसूल १० लाख कोटींवर पोहोचला असल्याने रिलायन्स १० लाख कोटींचा करपूर्व नफा मिळवणारी पहिली कंपनी ठरली आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २.६ टक्क्यांनी महसूलात वाढ झाली आहे.कंपनीचा एकूण ईबीआयटीडीए १६ टक्क्यांनी वाढत १.७८ लाख कोटींवर पोहोचला आहे.