सोने चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट गुंतवणूकदारांना मोठा दिलासा

23 Apr 2024 17:50:10

Gold
 
 
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचे पडसाद भारतीय सराफा बाजारात देखील उमटले आहेत. युएस स्पॉट गोल्ड दरात आज घट झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी युएस गोल्ड स्पॉट फ्युचर दर ८८ अंशाने घसरत २३०४ डॉलर्सपर्यंत गेले होते. मध्यपूर्वेतील दबावात घट होऊन बाजारात स्थिरता आल्याने आज सोन्याच्या दरात वाढ झालेली नाही.
 
भारतातील एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) या कमोडिटी बाजारातील गोल्ड निर्देशांकात ०.९८ टक्क्याने घट झाली असून सोन्याचे दर ७०४९९.०० पातळीवर पोहोचले आहेत. सोन्याबरोबरच क्रूड तेलाच्या निर्देशांकातही घट झाली आहे.
 
भारतातील सोन्याचे सरासरी दर प्रति ग्रॅम १५०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १४० रूपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याच्या दरात १४०० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १५३ रुपयांनी वाढ झाली आहे. तर २४ ग्रॅम सोन्याच्या प्रति १० ग्रॅममध्ये १५३० रूपयांनी वाढ झाली आहे.
 
१८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम दरात ११५ रूपयांनी वाढ झाली आहे. १८ ग्रॅम सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ११५० रूपयांनी वाढ झाली आहे.काल सोन्याचे प्रति ग्रॅम दरात ५० रूपयांनी घट झाली होती.काल २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५०० रुपयांनी तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ५५० रूपयांनी घसरण झाली होती.
 
आजच्या सोन्याच्या दरातील बदलाविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, ' "सोन्याच्या किमतींनी त्यांची घसरण सुरूच ठेवली, एमसीएक्समध्ये ८५० रुपयांची आणखी घसरण होऊन ७०३५० प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचली. या घसरणीचे श्रेय कॉमेक्स गोल्डमध्ये तीव्र घसरणीमुळे होते, जे दोन दिवसांच्या कालावधीत २३०० डॉलरच्या खाली घसरले. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी पुढील ड्रोन हल्ले करण्यापासून परावृत्त केल्यामुळे आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किमती वाढल्या होत्या,तथापि किंमती खाली आल्यास MCX मध्ये सोन्याच्या किमतीला समर्थन मिळू शकते पातळी, ६८५०० च्या दिशेने आणखी एक विक्री होऊ शकते, कारण मध्य पूर्वेतील जोखीम भावना थंड होईल.'
 
चांदीच्या किंमतीतही घट -
 
मुंबईत चांदीच्या किंमतीत प्रति १ किलो २५०० रुपयांनी घट झाली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.५१ टक्क्यांनी घट होत ८०१७०.०० पातळीवर चांदी पोहोचली आहे.
Powered By Sangraha 9.0