“मंत्रो से बढके तेरा नाम…जय श्री राम!”, रितेश-जिनिलीया मुलांसह पोहोचले अयोध्येत

22 Apr 2024 13:34:38
रितेश देशमुख पत्नी जिनिलीया व मुलांसह रामलललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेला आहे.
 

ritesh ayodhya  
 
मुंबई : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील एक आदर्श जोडपं म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया (Ritesh Genelia At Ayodhya) देशमुख यांची ओळख आहे. जितकी चर्चा रितेश-जिनिलायाची असते तितकीच चर्चा त्यांच्या दोन्ही मुलांची असते. रितेशची मुलं कायम मिडियाला पाहून हात जोडून नमस्कार करतात आणि त्यांच्या या कृतीचे कायमच कौतुक केले जाते. आता महाराष्ट्राचं हे लाडकं कपल मुलांसह अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या (Ritesh Genelia At Ayodhya) दर्शनासाठी गेले होते.
 
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला होता. यावेळी काही कारणास्तव रितेश-जिनिलीया हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता ही जोडी आपल्या दोन्ही मुलांसह रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला पोहोचली आहे. दर्शन घेतानाचा फोटो रितेशने सोशल मीडियावर शेअर केला आहे.रितेशने पोटो पोस्ट करत लिहिले आहे की, “मंत्रो से बढके तेरा नाम…जय श्री राम! आज तुझं दर्शन घेता आलं आम्ही धन्य झालो #राममंदिरअयोध्या”, असे कॅप्शन रितेश देशमुखने या फोटोला दिलं आहे.
 

ritesh ayodhya  
 
दरम्यान, रितेश-जिनिलीया कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्रेंडिंग रिल्सच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे सोशल मिडियावरही मनोरंजन करत असतात. दोघांच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास तर जिनिलीया लवकरच आमिर खानच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर, रितेश सध्या ‘हाऊसफुल्ल ५’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Powered By Sangraha 9.0