जागतिक वसुंधरा दिनी नवा अहवाल - १०० नोंदणीकृत कंपन्यांपैकी ५१ टक्के कंपन्या कार्बन इमिशनची माहिती देतात

22 Apr 2024 11:41:18

Net Zero
 
मुंबई: सरकारने पर्यावरणपूरक उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 'नेट झिरो' चे मिशन हाती घेतले होते. यासंबंधीचा नवीन पीडब्लूसी (PwC) अहवाल जाहीर झाला आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे,५१ टक्के कंपन्यांनी त्यांच्या उत्पादन निर्मितीतून किती कार्बन तयार होतो याची माहिती सरकारकडे दिली आहे.
 
ESG (Environmental, Social, Governance) धोरणात्मक कामगिरीसाठी कंपन्यांनी पर्यावरण संतुलित नवीन उपाययोजना करणे हे अपेक्षित असते. पर्यावरणवादी प्रतिमांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने आपल्या देशातील उद्योगांना उत्पादनातून निर्माण होणाऱ्या कार्बनची माहिती पुरवण्याचे सांगितले होते. २०७० पर्यंत सरकारने कार्बनमुक्त भारत मिशन हाती घेतले असल्याने यांची अंमलबजावणी कंपन्यांना बंधनकारक असते. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे ३१ टक्के कंपन्यांनी मिशन नेट झिरो स्विकारल्याचे सांगितले आहे.
 
निफ्टी ५० व निफ्टी नेक्स्ट ५० सहित सार्वजनिक क्षेत्रातील माहिती उपलब्ध असलेल्या कंपनीच्या BRCR अहवालाचे परिक्षण केले गेले होते. त्यांनी रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीचे आकलन करून हे निरीक्षण आर्थिक वर्ष मार्च ३१, २०२३ पर्यंत नोंदवले गेले आहे.
 
सरकारने ESG निर्बंध लागू केल्यावर सरकारने आधुनिकीकरणासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणपूरक नियमाचे पालन करणे अनिवार्य केले आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे, '१०० नोंदणीकृत कंपन्यांपैकी ५१ टक्के नव्या कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये स्कोप ३ डेटा (Scope 3 Data) BRSR (Business Responsibility and Sustainability Reporting) जाहीर केला आहे.
 
कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानकांची कशी अंमलबजावणी केली आहे ते पाहणे महत्त्वाचे ठरते असे अहवालात म्हटले गेले आहे.अहवालावर भाष्य करताना PwC India चे ईएसजी पार्टनर व लिडर संबितोष मोहपात्रा म्हणाले,'बीआरएसआर व्यवसायांसाठी अनिवार्य अहवाल बनल्यामुळे, बोर्डरूम चर्चेत ईएसजीचा विचार मुख्य धोरणात्मक प्राधान्यक्रम बनला आहे.हे टिकाऊपणा (Sustainability) आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींच्या महत्त्वाच्या वाढीव जागरूकतेची साक्ष आहे.'
 
अहवालातील माहितीप्रमाणे, १०० नोंदणीकृत कंपन्यांपैकी ४४ कंपन्या आपल्या उत्पादनांचे लाईफ सायकल असेसमेंट (Life Cycle Assessment) कलतात.८९ टक्के कंपन्या त्यांच्या लिडरशीप निर्देशांकांवर माहिती देतात.४९% कंपन्या अक्षय उर्जा (Renewable Energy) करण्यासाठी शक्ती खर्च करतात. याशिवाय काही कंपन्यांनी पर्यावरणपूरक कामगिरीसाठी एलईडी लाईट, पर्यावरणपूरक एअर कंडिशनिंग, नवी हिंटिंग प्रणाली, व इतर धोरणे अवलंबली आहेत.
 
Powered By Sangraha 9.0